केसरी दिवाळी अंक १९७२ गणपतीची धामधूम सुरू झाली की सर्वात आधी मूर्तीची आगाऊ नोंदणी करण्याची लगबग असते. मग वर्तमानपत्रांतून प्रत्येक वर्षी नेमाने मूर्तिकारांच्या समस्या वगैरे यांवर लेख प्रसिद्ध होत असतात. १९७२ साली तत्कालीन सरकारने गणपतीच्या मूर्तींवर विक्रीकर लावण्याची घोषणा केली होती. त्यावर्षी एका कवीने या निर्णयाचा आपल्या कवितेतून निषेध केला होता. आणि ही कविता केसरीच्या दिवाळी अंकात छापूनही आली होती. गणपती उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हीच कविता आज वाचकांसाठी देत आहोत. ********** कार असणाऱ्यांना कर असावेत कर आहेत त्यांना डर असावी हे सगळं खरं आहे पण गणपतीला का कर? त्याला आधीच चार कर आहेत तो शुभंकर आहे भरीस भर विक्रीकर कशाला? इतके दिवस समजत होतो- केवळ सूर्यच सहस्रकर आहे पण आमचं सरकारही सहस्रकर आहे हे कळून आलं. निरनिराळ्या नावाचे सहस्र कर नक्की असतील घर बांधलं की कर आहे दुकान घातलं की कर आहे काही विकलं तर कर आहे उत्पादन केलं तरी कर आहे घेतलं तरी कर आहे. हे कसलं सरकार? हे कसलं राज्य? बाणभट्टानं कादंबरीत आदर्श राज्याची कल्पना सुंदर सांगितली आहे हे वाचून तरी सरकार कर कमी करील काय? बाणभट्ट म्हणतो, "यस्मिन राज्ये करग्रहणं विवाहसमये एवम्" काय ग्रॅंड कल्पना आहे निदान गणपतीला तरी सेल्स टॅक्स मधून विक्रीकरांतून सोडवा अशी जनतेची मागणी आहे अर्थमंत्री कितपत मानतात ते पाहूया .. बाणभट्टाच्या श्लोकाचा अर्थ : ज्या राज्यात 'कर' ग्रहण विवाहाच् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
कविता रसास्वाद
, कविता
, केसरी
mugdhabhide
8 वर्षांपूर्वी‘कर’ shabdawarachi कोटी uttam