आपला मोठा भाऊ दक्षिणेत येत आहे हे पाहून निजाम सलाबतजंग याचें धाबे दणाणले. त्याचा मुख्य प्रधान सय्यद लष्करखाना आतून मराठ्यांना सामील झाला होता. निजामाचे अनेक सरदार गाजीउद्दीनशीं कारस्थानें करीत होते. तरी सलाबतजंग हा फ्रेंच सेनापति बुसी याची मदत घेऊन औरंगाबादेकडे येऊ लागला. इकडे गाजीउद्दीन ऑगस्ट महिन्यांत (१७५२) बु-हाणपुरास पोहोंचला. तेथें त्याने खानदेश सुभ्याची सनद मराठ्यांच्या नांवें लिहून दिली. तेथून तो मराठ्यांचे प्रचंड सैन्य घेऊन औरंगाबादेस आला. त्याचा प्रतिकार करण्याकरितां निजाम सलाबतजंग हा औरंगाबादेजवळ पोहोंचला होता. नानासाहेब पेशवा आपले सैन्य घेऊन गाजीउद्दीनला मिळण्याच्या उद्देशानें औरंगाबादेकडे रवाना झाला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .