ललितकलेची तिसरी पिढी सध्या चालू आहे. भालचंद्र पेंढारकरांनी 'दुरिताचें तिमिर जावो" या नाटकांत नाट्यपूर्ण संगीताची थोडी झलक दाखविली आहे. या रस्त्यानें जर ते पुढे गेले तर खरोखरीच नाट्यनिर्मिति करणारें संगीत त्यांच्या हातून रंगभूमीवर येईल असे वाटते. नाविन्याचा वारसा त्यांना केशवराव बापुरावांकडून मिळाला आहे. बापुराव केशवरावांना जमलें नाहीं तें भालचंद्र पेंढाकर करून दाखवितील अशी मला वरील नाटकांतील संगीतावरून आशा वाटते. प्रेक्षकांनीं हि अशा नव्या प्रयोगांकडे कलात्मक दृष्टीनें आणि कौतुकानें पाहिलें पाहिजे. या नाटकांत संगीत कमी पडते असल्या पारंपारिक खुळ्या दृष्टीनें न्यून काढू नये.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .