अंक - अंतर्नाद, एप्रिल २०१४ 'अक्षरांचा श्रम केला' असं संत तुकाराम म्हणतात, तो श्रम सर्जनशील लेखकांच्या प्रतिभांचा आविष्कार असतो. गीता, ज्ञानेश्वरी यांसारख्या रचना, रामायण-महाभारतासारखे महाग्रंथ ही आपली मोठी संपत्ती आहे. महाकवी कालिदासाचे 'अभिज्ञान शाकुंतलम्' डोक्यावर घेऊन नाचावं असं गटे नामक कवीला उगाचच नाही वाटलं. मानवी प्रवृत्तींवर, नातेसंबंधावर असं चिरकाल टिकणारं भाष्य करणारे जे इंग्रजी ग्रंथ आहेत त्यात शेक्सपीअरचं स्थान एकमेवाद्वितीय आहे. शेक्सपीअरचा जन्मदिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करतात. ग्रंथालयाचं आणि त्या अनुषंगानं ग्रंथांचं, पुस्तकांचं आपल्या जगण्यातलं महत्व सांगणारा हा लेख भानू काळे यांनी २०१४ साली अंतर्नादमध्ये लिहिला होता. हा लेख तुम्ही 'पुनश्च' या डिजिटल माध्यमातून वाचता आहात, त्यामुळे ग्रंथांचं स्वरूप बदलून आता ते हळू हळू नवं रूप धारण करीत आहेत, याची खूणगाठ आपण बांधलेली आहेच. उत्तम आणि दर्जेदार वाचनातून ती गाठ आपण अधिकाधिक पक्की करत राहू असा संकल्प या निमित्तानं आपण सोडू या..पुनश्च त्यात आपल्या सोबत असेलच. २३ एप्रिल हा विल्यम शेक्सपिअर याचा जन्मदिन. हाच त्याचा मृत्यूदिनही. बरेच जण त्याला जगातील सर्वश्रेष्ठ लेखक मानतात. ‘‘एक वेळ आम्ही आमचे सगळे साम्राज्य देऊ, पण आमचा शेक्सपिअर आम्ही कधी गमावणार नाही,’’ असे त्याच्याविषयी इंग्रज म्हणत असत. पुस्तकांविषयीच्या त्याच्या काही ओळी सुरेख आहेत. त्या अशा : ‘महाशय, त्याने कधी पुस्तकात साकार झालेल्या छोट्या-छोट्या सौंदर्यवतींचा - सुंदर छोट्या गोष्टींचा - आस्वाद घेतलेला नाही, ना कधी त्याने कागद ‘खाल्ला’ आहे ना कधी शाई ‘प्यायली’ आहे, त्याच्या बुद ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
5 वर्षांपूर्वी
खूप माहितीपूर्ण लेख आहे. गाव तेथे ग्रंथालय ही संकल्पना, शासनाच्या इतर लोकप्रिय घोषणांसारखी....! त्याचं कारण आहे शासनाबरोबर जनतेची उदासीनता. जे जे उपक्रम शासन हाती घेते, त्याला लोकसहभागाची जोड मिळत नाही, तोपर्यंत ते उपक्रम शासकीय पद्धतीने चालतात..कालांतराने अंतर्धान पावतात. हीच अंतर्धान पावण्याकडे एकंदर वाचनालय चळवळीची वाटचाल सुरू आहे. शासकीय अनुदान मिळते म्हणून अनेक वाचनालये उभी राहिली. कालांतराने त्यातली फक्त अनुदानापुरती कागदावर उरलीत. दरवर्षी यंत्रणेकडून तपासण्या केल्या जातात. अर्थपूर्ण संबंधातून all is well चा शिक्का बसला की अनुदानाची वाट मोकळी होते. याऊलट तुटपुंज्या अनुदानावर निष्ठा म्हणून चालणारी वाचनालये, कशीबशी तग धरून आहेत. वर्तमानपत्रे, नियतकालिके, वीज बील, कर्मचारी मानधन, इमारत भाडे इत्यादी आनुषंगिक घटकांच्या किमती वाढल्यात. पण गेल्या कित्येक वर्षात शासनानुदान आहे तेवढेच आहे. त्यामुळे अशी वाचनालये शेवटच्या घटका मोजत आहेत. जी वाचनालये केवळ कागदावरच आहेत, ती सक्तीने बंद करावी. त्यामुळे अनुदानाची एक मोठी रक्कम वाचेल आणि तीच रक्कम कशीबशी तग धरून असलेल्या वाचनालयांना वाढीव अनुदान स्वरूपात वितरित केली तर त्यांना संजीवनी मिळेल.. क्षमस्व, थोडं विषयांतर झालं. पण आजची वाचनालयांची अवस्था पाहून लिहिल्यावाचून राहावले नाही. आणि जोपर्यंत लोकसहभाग वाढत नाही, लोकचळवळीचे स्वरूप येत नाही, तोपर्यंत ग्रंथालय चळवळ उभारी घेणार नाही.
[email protected]
5 वर्षांपूर्वीवाचन हि सवय होण्यासाठी, योग्य वयातच याची जाणीव करून देणे व सवय लावण्याची गरज आहे. मात्र सध्याच्या शिक्षणपद्धती मधे समजून वाचणे हा प्रकार नाही. प्रश्न व त्याचे तयार उत्तर याचीच सवय मुलांना लावल्याने वाचन संपत चाललेले आहे.
rajandaga
5 वर्षांपूर्वीसुन्दर माहिती पूर्ण लेख
patankarsushama
5 वर्षांपूर्वीखूप माहितीपूर्ण लेख
Praveen
5 वर्षांपूर्वीखूप सुंदर लेख
[email protected]
5 वर्षांपूर्वीफार छान लेख.वाचनाच्या आवडीची जोपासना करण्याचं काम समृद्ध ग्रंथालयं आणि प्रामुख्याने तिथले ग्रंथपाल करत असतात.छोट्या गावातल.या महाविद्यालयात ही मला असे ' सुजाण ग्रंथपाल भेटले आणि जी. ए .कुलकर्णी नावाच्या गारूडाची ओळख झाली!👏
[email protected]
5 वर्षांपूर्वीअतिशय छान असा लेख
[email protected]
5 वर्षांपूर्वीउत्तम..वाचकांसाठी प्रेरणादायी
[email protected]
5 वर्षांपूर्वीSundar !
rsrajurkar
5 वर्षांपूर्वीखूप उपयुक्त आशा सूचना भानू काळे सरांनी येथे लेखा मार्फत दिल्या. अशा सोईनी सुसज्य ग्रंथालयाची गरज आहे. खूप छान लेख . धनयवाद .
shripad
5 वर्षांपूर्वीछान आहे लेख!