कर्णाचे गूढ, कुरुंदकर आणि साधले


अंक : दीपावली जानेवारी १९७० जर्मन कवी गटे शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला होता असं म्हणतात. महाराष्ट्राने खरे तर नरहर कुरुंदकरांना तसेच डोक्यावर घेऊन नाचायला हवे होते. विद्वत्ता हा शब्दही ज्यांच्यासाठी अपुरा पडेल असे त्यांच्या  बुद्धीचे तेज होते आणि ज्ञानाचे वजन होते. कुरुंदकर मॅट्रिक झाले तेव्हा त्यांनी लिहिलेले पुस्तक बीएच्या अभ्यासक्रमाला लागलेले होते. वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी व्यासपीठावर भाषण करता करताच कोसळून त्यांचा मृत्यु झाला. परंतु अवघ्या अर्धशतकी आयुष्यात त्यांनी धर्म,मानसशास्त्र, इतिहास, राजकारण, कला, समीक्षा यांचा जो अभ्यास केला होता तो केवळ एक चमत्कारच म्हणावा लागेल. शिवाजी महाराजांच्या अवघ्या कर्तृत्वाचा अभ्यास करुनही एखाद्याला त्यांचे मोठेपण नेमकेपणी कळणार नाही ते कुरुंदकरांनी  श्रीमानयोगी या कादंबरीच्या लिहिलेल्या प्रस्तावनेतून कळते. कुरुंदकरांचे सगळेच लिखाण असे आपल्या जाणिवांचे कोपरे लख्ख करून टाकणारे आहे. प्रस्तुत लेखही तसाच. कुरुंदकरांनी महाभारताचा किती प्रकारे आणि किती खोलवर अभ्यास केला होता हे यातून कळते. आनंद साधले यांनी कर्णावर लिहिलेली 'महापुरुष' ही कादंबरी कुरुंदकरांना पाठवली. ती वाचून कुरुंदकरांनी लिहिलेले हे रोखठोक पत्र आहे. ते लिहिण्यात कुरुंदकरांची भूमिका जेवढी  नितळ, प्रामाणिक आहे तेवढीच ते पत्र प्रसिद्धीला देताना साधलेंचीही आहे. हा लेख वाचल्यावर  'महापुरुष' ही फारशी चर्चा न झालेली कादंबरी मिळवून वाचण्याची इच्छा होते आणि कुरुंदकर याच मातीत जन्माला आले होते या भावनेतून अंगावर अभिमानाचा काटाही फुलतो- कुरुंदकरांचे हे पत्र १९७० सालच्या जानेवारीत 'दीपावली'  या मासिकात प्रसिद्ध झाले होते. **********

कर्णाचे मो ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


दीपावली , महापुरुष , साहित्य रसास्वाद

प्रतिक्रिया

 1. mukundmk

    2 वर्षांपूर्वी

  या अंकाला 50 वर्षे झाली. पत्र तर त्याही पूर्वीचे ! इतके जुने अंक वाचणे सोडा, बघणे दुष्प्राप्य ! बहुविधमुळेच असले काही भाग्ययोग ! कुरुंदकरांचे पत्र व बहुविधची स्तुती ! आसे वाटायला नको, म्हणून ... ते थोर होते हे सांगायला माझी गरज नाही. नि माझी योग्यता नाही. ????? जाता जाता, याच साधलेंचे रामायणावरील आता दुर्मिळ झालेले 'रामायणाचे रामायण' हे पुस्तक गतवर्षी मी वाचले. त्यावर काही मिळाले तर ... बहार येईल !

 2. [email protected]

    3 वर्षांपूर्वी

  अतिशय वाचनीय,अभ्यसनीय लेख. कुरुंदकरांचं वाचन वाचण्याची जिज्ञासा जागृत झाली आहे.एक पुस्तक वाचून लिहिलेल्या पत्रात हा माणूस किती प्रकार ची माहिती कुठलाही आव न आणता सहजतेने देतो.स्वतंत्र लेखात त्यांची प्रज्ञा तेजाने किती तळपत असेल याची त्यामुळे चांगलीच कल्पना येते.

 3. Aashokain

    3 वर्षांपूर्वी

  हा लेख वाचून 'मला अजून कितीतरी वाचन करायचे आहे' याची जाणीव झाली. साधलेंची पुस्तके वाचली होती. त्यांंचे मातीची चूल हे आत्मचरित्र व 'हा जय नावाचा इतिहास आहे' ही दोन पुस्तके मनात रूतून बसली आहेत. सर्वस: आठवत नाहीत, पण.... प्रा. नरहर कुरूंदकरांच्या पुस्तकांचे वाचन राहून गेलय. आठवतेे ती दाजी पणशीकरांच्या 'महाभारत एक सूडाचा प्रवास' ची दमदार प्रस्तावना! आता समग्र कुरुंदकर वाचायला हवेत ही ऊर्मी जागी झाली, वरील लेखामुळे. वाचकांपैकी कोणाला माहीत असल्यास 'समग्र कुरुंदकर वाङ्मय' हे कोणी कळवू शकेल काय?

 4. Rajrashmi

    3 वर्षांपूर्वी

  सुंदर, त्यांच्या वर आम्ही अभिप्राय देणार, सलाम

 5. Makarand

    3 वर्षांपूर्वी

  विशुद्ध चिकित्सा आणि तर्कशुद्ध विश्लेषण याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे हे कुरुंदकरांचे पत्र. महाभारताच्या प्रत्येक अभ्यासकाने वाचायला हवे. या लेखाच्या प्रकाशात भैरप्पांची पर्व वाचायला नवी मजा येईल मात्र त्याआधी साधलेंची महापुरुष वाचायलाच हवी

 6. Lucky

    3 वर्षांपूर्वी

  खूप छान.एक उत्कृष्ट समीक्षा आपल्यामुळे वाचावयास मिळाली.याबद्द्ल आपले मन:पूर्वक अभिनंदन. यापुढेही असेच उत्तमोत्तम लेख वाचावयास मिळावेत अशी अपेक्षा. महापुरूष ही कादंबरी वाचण्याची आवड निर्माण झाली.

 7. seemadighe

    3 वर्षांपूर्वी

  श्री कुरुंदकर सरांनी अभ्यासपूर्ण केलेली समीक्षा वाचायला मिळाली, खूप दिवसांनी उत्कृष्ठ समीक्षा वाचण्यात आली.

 8. [email protected]

    3 वर्षांपूर्वी

  महाभारत ही एक शाश्वत साहित्यकृती असल्यामुळे तिची वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या दृष्टिकोणातून चर्चा होणे अपेक्षितच आहे. मात्र कुरुंदकरांची समीक्षा अतिशय अभ्यासपूर्ण आहेत.

 9. parelkarmg

    3 वर्षांपूर्वी

  या दोन्ही काद्म्बार्या मध्ये कर्ण हा मोठा करून दाखविला आहे. आज काल ती पद्धतच पडून गेली आहे. या मागे राजकारणी लोक ही असतील. कोणते महाभारत खरे हे कोण ठरविते ? चार लोक जे सरकारी मदतीवर संस्था चालवितात. astrological calculation प्रमाणे महाभारताचा काळ हा १०००० वर्षापूर्वी चा आहे. मूळ ग्रंथ british and german लोकांकडे आहेत. त्यांनी केलेल्या भाषांतरा वरून आपण चालतो. एकलव्याचे ही मतांसाठी उदात्ती कारण चालले च आहे. कर्णाला अर्जुनाणे घोष यात्रे च्या वेळी हरविले होते. त्यामुळे मिळेल तेथे या चुका केलेल्या आहेत असे माझे मत आहे.

 10. deepa_ajay

    3 वर्षांपूर्वी

  श्री कुरुंदकारांकचे जेवढं मिळेल तेवढं साहित्य प्रकाशित करा, करुंदकर मंजे ज्ञानाची मेजवानी

 11. Sadhana

    3 वर्षांपूर्वी

  अप्रतिम समीक्षा

 12. anudeep

    3 वर्षांपूर्वी

  लेख सुंदर,महापुरूष वाचण्याची उत्सुकता

 13. ajitpatankar

    3 वर्षांपूर्वी

  कुरुंदकरांनी त्यांचे विचार अगदी स्पष्ट शब्दात व्यक्त केले आहेत.. महाभारत हा जगातील सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे... महाभारतात माणसांच्या स्वभावाचे सर्वच नमुने आहेत.. महाभारत कालानंतर हजारो वर्षांनी आज घडणाऱ्या अनेक घटना महाभारतात घडलेल्या आहेत.. कारण माणसाचा स्वभाव काही बदलेला नाही.. म्हणूनच “व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम” असे म्हणतात.. महाभारत फार गुंतागुंतीचे आहे.. त्यामुळे महाभारतातील प्रत्येक व्यक्तीरेखेकडे माणूस म्हणून पाहाणे गरजेचे आहे.. हि माणसे कधी दुष्ट होतात. कधी “Larger than life” होतात, तर कधी सामान्य माणसासारखे वागतात.. कृष्ण उघडपणे पांडवांच्या बाजूचा होता.. त्याच्या शिवाय युद्धात विजय मिळविणे पांडवांना शक्य झाले नसते.. धर्मराज “नरो वा कुंजरोवा” म्हणालाच... भीष्माचार्य व द्रोणाचार्य अगतिक होते.. “अर्थस्य पुरुषो दास:” हे सत्य महाभारत कालीन आहे.. महाभारत असो वा रामायण याचे अनेक अन्वयार्थ काढता येतील.. काढलेले आहेत.. रामाला वनवासात पाठविणे हा कैकयीचा “राज्यविस्तारचा game plan” होता असेही मी वाचले आहे.. मृत्युंजय वा महापुरुष या कादंबरीबाबत बोलायचे तर कर्ण शूर, दानशूर, तेजस्वी, निष्ठावान विद्वान होताच पण अर्जुनाने कर्णाचा अनेकदा पराभव केला होता हे विसरता येणार नाही... “एखादे झाड उंच ठरवायचे, आणि आजूबाजूच्या झाडांचे शेंडे कापून टाकायचे. म्हणजे आपण ठरविलेले झाड आपोआपच सर्वात उंच दिसते” अशा प्रकारच्या कांदबऱ्या म्हणजे असा सारा प्रकार आहे..

 14. vijaykaranjekar

    3 वर्षांपूर्वी

  अप्रतिम लेख. कुरुंदकरांची अफाट विद्वत्ता वादातीत आहे. पण मला कुरुन्दकरांवरील मे. पु. रेगे ह्यांच्या एका लेखाची आठवण झाली. वेगळ्या प्रकारचा तो लेख होता. कृपया मिळाल्यास तोही लेख वाचकांसाठी उपलब्ध करून द्यावा ही विनंती.

 15. drpushkar

    3 वर्षांपूर्वी

  लेखाच्या पूर्वी आपण म्हणालात हे अक्षरशः खरं आहे . कुरुंदकरांनी लिहिलेली श्रीमनयोगी ची प्रस्तावना केवळ अप्रतिम. एक माणूस म्हणून शिवाजी महाराजांचा विचार केला आहे. आपल्याकडे महापुरुषांना देवत्व बहाल करण्याची परंपरा आहे. एकदा एखाद्याला देवत्व बहाल केलं की त्यांच्यासारखी वागण्याची आपली जबाबदारी संपते पण तसं न करता कोणत्याही महापुरुषाचे वर्तन माणूस म्हणून अभ्यासण्याचा प्रयत्न केल्यास त्यातून आपल्याला काहीतरी शिकण्याची संधी निर्माण होते. महाराष्ट्रातील वैचारिक परंपरेचे पाईक असलेल्या कुरुंदकरांचा लेख वाचून खूप बरे वाटले. 'पुनश्च' अभिनंदन

 16. Umeshk

    3 वर्षांपूर्वी

  काय अफाट अभ्यासू वृत्ती ने चिकित्सा केली आहे . जबरदस्त . खूप नविन आयाम मिळाले विचार करण्यासाठी .. जाता जाता मृत्युंजय हि माझी काॅलेज जिवना पर्यंतची फार आवडती कांदंबरी .. नव्याने नंतर वाचल्या नंतर फक्त अलंकारिक शब्दांनी पाने वाढवल्याचा फिल आला . नक्कीच ती फार श्रेष्ठ कादंबरी मुळीच नाही .

 17. Bhagwat

    3 वर्षांपूर्वी

  छानच।त्या काळात गेल्यासारखे वाटते।

 18. Prachij

    3 वर्षांपूर्वी

  फार सुंदर लेख. महापुरुष वाचलं पाहिजे आता.

 19. prakash

    3 वर्षांपूर्वी

  फार दिवसांनी उत्तम समीक्षा वाचनाचा योग आला. पुनश्च कारांचे हार्दिक आभार!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen