गेले काही दिवस पावसाने जवळपास पूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावून सगळं वातावरण गारेगार केलंय. पण पाऊस नक्की पडतो तरी कसा? आपल्याला सांगतोय थेंबू! हो हो थेंबू ! थेंबूची ही छानशी गोष्ट. या थेंबूला आपल्यासाठी बोलका केलाय ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. बाळ फोंडके यांनी! ‘वयम्’ मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख खास बाल-किशोरांना वाचायला पाठवत आहोत.
मित्रांनो, मी आलोSSS मी... पावसाचा थेंब! तुम्ही जेव्हा माझं चित्र पाहता तेव्हा ते उलट्या भोवऱ्यासारखं दिसतं. तुमचे चित्रकार माझं चित्र नेहमी असंच काढतात. पण माझं खरं रूप तसं नाहीच मुळी. ते कसं आहे हे सांगण्यासाठीच तर मी तुमच्यासमोर आलोय. मी माझ्या खऱ्या रूपात तुमच्यासमोर आलो तर तुम्ही मला ओळखणार नाही. तर दोस्तहो, मी आहे थेंबू. लिंबूटिंबू नाही. थेंबू. पाऊसथेंबू. म्हणजे पावसाचा थेंब. थेंबू हे माझं लाडकं नाव आहे. मी खरोखर कसा दिसतो हे सांगण्यासाठी तुम्हांला माझी सगळीच कहाणी सांगायला हवी. अगदी माझ्या जन्मापासूनची. तुम्हांला ठाऊकच आहे की, माझा जन्म ढगामध्ये होतो. ढग म्हणजे तरी काय हो! नुसती वाफ. हवेत तरंगणारी पाण्याची वाफ. म्हणजे ढगांमध्ये मी असतो तो वायुरूपात. आता दिसतो ना, तसं द्रवरूप धारण करण्यापूर्वी मला माझं बस्तान बसवायला काही बैठक शोधावी लागते. तशा अनेक बैठकी हवेत असतातच म्हणा. समुद्रातल्या खाऱ्या पाण्याची वाफ होऊन जेव्हा ती हवेत जाते, तेव्हा त्या पाण्यातल्या काही क्षारांचे बारीक बारीक कणही हवेत येतात. तिथंच विहरत राहतात. शिवाय धूळ तर नेहमीचीच आहे. आजकाल तर तुम्हा मंडळींच्या उपद्व्यापापायी अनेक प्रकारच्या प्रदूषकांचे कणही हवेत विहरत असतात. मला माझी बैठक म्हणून यातले कोणतेही कण चालतात. मग ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
vilasrose
5 वर्षांपूर्वीलेख आवडला