काय, नवीन पाठ्यपुस्तकं पाहिलीत का? शैक्षणिक वर्ष सुरू झालं की पाठ्यपुस्तकं पाहायची ओढ लागते ना? यंदा तर अजून शाळा सुरू नाही झाल्या, पण पाठ्यपुस्तकं मात्र वेळेत आली. पाठ्यपुस्तक या प्रकारचा शोध कधी, कुणी लावला, पहिलं पाठ्यपुस्तक कधी प्रसिद्ध झालं, माहितीये?... 'वयम्' मासिकाच्या जुलै 2014 अंकात प्रसिद्ध झालेला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांचा हा लेख आज मुद्दाम तुम्हाला वाचायला देत आहोत.
'नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास मला खूप आवडायचा' हे वाक्य तुम्ही अनेकदा वाचलं/ऐकलं असेल. आत्ता प्रौढ असणाऱ्या अनेकांसाठी 'नवं पुस्तक' म्हणजे 'पाठ्यपुस्तक'च असायचं. कारण बाकी इतर कोणती पुस्तकं हातात पडायचीच नाहीत. शाळेत जाऊन साक्षर झालेल्या सगळ्यांच्या आयुष्यात सर्वाधिक महत्वाचं स्थान असलेली पुस्तकं म्हणजे पाठ्यपुस्तकं! आज तुम्ही मुले ज्या गोष्टी तुमच्या पालकांकडून किंवा आजी-आजोबाकडून ऐकता ना, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी पूर्वी पाठ्यपुस्तकांत होत्या. 'लांडगा आला रे आला' ही गोष्ट असो किंवा 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही' ही लोकमान्य टिळकांची गोष्ट असो, या गोष्टी पिढ्यानपिढ्या सांगितल्या जात आहे, याचे कारण त्या पूर्वी पाठ्यपुस्तकांत होत्या. शालेय वयांत पाठ्यपुस्तकं फार महत्त्वाची मानली जातात. जगभर पाठ्यपुस्तकं वापरली जातात. त्यांचं स्वरूप, पद्धत अन महत्व वेगवेगळं असू शकतं, पण पाठ्यपुस्तकं नसलेल्या शाळा फार क्वचित आढळतील. आपल्याकडं तर 'सिल्याबस' संपवायचं म्हणजे पाठ्यपुस्तक शिकवून/शिकून संपवायचं, असाच अर्थ घेतला जातो. इंग्रजांच्या काळापासून भारतात शाळा आखीव-रेखीव बनल्या. शिक्षकांनी नेमून दिलेलं पुस्तक निमु ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, शिक्षण
, ज्ञानरंजन
, बालसाहित्य