रात्री उडणारे ‘पतंग’

वयम्    मकरंद जोशी    2020-07-21 15:15:31   

दि.१८ ते २६ जुलै हा आठवडा भारतात National Moth week म्हणून साजरा होत आहे. फुलपाखरांचे चुलतभाऊ म्हणता येतील अशा पतंगांच्या जगाची आम्हांला ( मी आणि युवराज गुर्जर Yuwaraj Gurjar) ओळख झाली, ती येऊरला अचानक दिसलेल्या अॅटलास मॉथ मुळे. डॉ. अरूण जोशी आणि आयझॅक किहीमकर Isaac Kehimkar हे आमचे सुरुवातीचे मार्गदर्शक. जानेवारी २०१५ मध्ये 'वयम्' मासिकासाठी संपादिका शुभदा चौकर यांनी मला संक्रांत विशेषांकात 'पतंगां'वर लेख लिहायला सांगितला, तो लेख म्हणजे- ‘रात्री उडणारे पतंग’. ‘राष्ट्रीय 'पतंग' महोत्सव २०२०’च्या निमित्ताने पुन्हा एकदा वाचकांसाठी आम्ही शेअर करतोय-

  निसर्गाच्या अफाट पसाऱ्यामध्ये एक संगती आहे. वर वर पाहता विखुरलेले वाटणारे यातले घटक एकमेकांशी घट्टपणे जोडलेले आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येक घटकाचे एक विशिष्ठ स्थान ठरलेलं आहे, कारण त्या स्थानावर त्याला एक ठराविक भूमिका बजावायची असते. यातूनच निसर्गातल्या बहुविधतेचा जन्म झाला. याचं एक नेहमी दिसणारं उदाहरण म्हणजे, फुलझाडांमधील काही झाडे रात्री फुलतात. आता या रात्री फुलणाऱ्या झाडांचे परागीभवन म्हणजे बीज प्रसार कोण करणार? त्यासाठी निसर्गात रात्री उडणारी फुलपाखरे अस्तित्वात आली. या रात्री उडणाऱ्या फुलपाखरांना आपण  ‘पतंग’ म्हणून ओळखतो. या पतंगांची शरीर रचना काही सूक्ष्म फरक सोडले तर फुलपाखरांशी अगदी मिळती जुळती असते, त्यामुळे अनेकदा गफलतीने यांना फुलपाखरू समजण्यात येते.पण बहुसंख्य फुलपाखरं दिवसा उडतात. अर्थात नियमाला अपवाद असतातच. आपल्या तडक भडक रंगांनी आणि पंखांवरील चित्रविचित्र नक्षिने लक्ष वेधून घेणाऱ्या या पतंगांची दुनिया आहे तरी कशी ते जाणून घेऊ या ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘वयम्’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.