गंध आणि आठवणी याचं एक छान नातं आहे. हा गंध बसल्याजागी आपल्याला स्थळ-काळ कोणत्याही मर्यादेशिवाय कुठेही घेऊन जातो. आठवा बघू तुम्हाला जुन्या आठवणी करून देणारे वेगवेगळे गंध! एक गंध तर सगळ्या मुला-माणसांना धुंद करतो तो म्हणजे पहिल्या पावसानंतर पसरणारा मातीचा गंध... त्याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचू या पद्मश्री पुरस्कारप्राप्त वैज्ञानिक डॉ. शरद काळे यांचा लेख! ‘वयम्’ मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख आज या नव्या माध्यमात प्रसिद्ध करत आहोत. पहिल्या पावसात भिजताना मातीचा सुवास अनुभवलाय तुम्ही? त्याला म्हणतात मृद्गंध. मृदा म्हणजे माती. मातीच्या हा गंध छान खमंग असतो. दोन्ही नाकपुड्या फुलवून जेवढा हा मृद्गंध शरीरात घेता येईल तेवढा घ्या. हा मृद्गंध फक्त पहिल्या पावसानंतरच कां येतो, माहितीये? या मृद्गंधाची निर्मिती नेमकी कशी होते? जर आपण माळरानावर किंवा शेतावर अ सलो तर तिथे हा मृद्गंध शहरापेक्षा अधिक जाणवतो. असे कां? हा मृद्गंध साठवून ठेवता येतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मनोरंजक आहेत. या प्रश्नांच्या उत्तरातून तुम्हांला निसर्गात घडत असलेल्या विविध बाबी समजू शकतील. तुम्हांला माहितीये, मृद्गंधाची निर्मिती जीवाणू व कवके करीत असतात. जेव्हा माती उन्हाळ्यात अगदी कोरडी असते, तेव्हा देखील जीवाणू व कवके या दोन सजीव वर्गातील मंडळी त्यांचा जीवनक्रम जगत असतात. हे करताना त्यांच्या उत्सर्जक क्रियांमधून `जिओस्मिन’ नावाचा रासायनिक पदार्थ निर्माण होत असतो. पण ह्या जीवाणू पेशींमध्ये किंवा कवकांमध्ये वेगळी उत्सर्जक प्रणाली नसल्यामुळे ते पेशींमध्ये साठून राहते. उन्हाळा जसा कडक होत जातो, तसतसे जमिनीतील पाणी कमी होऊ लागते आणि मग हे असंख्य जीव पाण्याअभावी म
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Narayan Rane
4 वर्षांपूर्वीmatichya sugandha sarakhe paripurna knowledge
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीविज्ञान हे असे सोप्या पद्धतीने समजावले तर लगेच समजते. धन्यवाद
[email protected]
5 वर्षांपूर्वीखूपच माहितीपूर्ण लेख .