अंक : प्रिय रसिक, ऑगस्ट २०२१
मुंबईच्या इतिहासातील गिरणगांव संस्कृती, तिचे वैभव अनेकांनी अनुभवले आहे. या वैभवशाली संस्कृतीची पडझड होऊन ही संस्कृतीच कालांतराने नामशेष झाली. या पडझडीचे पडसाद अत्यंत परखडपणे पण संवेदनशील लेखणीतून मांडणारे नाटककार,कथाकार जयंत पवार यांचे दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी निधन झाले.
मराठी रंगभूमीवर तसेच वाङ्मयक्षेत्रात नाटककार आणि कथाकार म्हणून जयंत पवार यांची एक वेगळी ओळख होती. गिरणगावातले कष्टकरी, कामकरी जीवन त्यांनी आपल्या नाटकांतून, कथांतून मांडले. मुंबईतल्या कामगारवस्तींतल्या, चाळसंस्कृतीतल्या माणसांच्या मनोविश्वाची पार्श्वभूमी असलेल्या त्यांच्या लेखनातून सामान्य माणसाचा आनंद, दु:ख, त्याच्या जगण्यातील ताण त्यांनी सच्चेपणाने मांडला. मराठी रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाटक म्हणून त्यांच्या अधांतर या नाटकाकडे हिले जाते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत काय डेंजर वारा सुटलाय; या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. तसेच या नाटकाला महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारही लाभला आहे. २०१४च्या जानेवारी महिन्यात महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषवले होते. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी २०१२ चा साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. नाटक, एकांकिका, कथा, पटकथा, नाट्यसमीक्षा असे विविधअंगी लेखन करणारे जयंत पवार यांना चौदा विविध लेखन पुरस्कार लाभले.
...
अधांतर; या त्यांच्या पहिल्या नाटकापासून पॉप्युलर प्रकाशनाबरोबर सुरू झालेला त्यांचा ऋणानुबंध फार लवकर थांबल्याची चुटपूट
कायम राहील!
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .