अंक : अनुभव-जानेवारी २०२१
शहरी वेळापत्रकाला अन् धावपळीला बांधली गेलेली माणसं गावाकडच्या शेती-मातीत रमतात तेव्हा..
हे सगळं सुरू झालं साधारण १५-१७ वर्षांपूर्वी. तोपर्यंत आम्ही आमच्या संसारात, नोकरी-व्यवसायात बर्यापैकी स्थिरावलो होतो. महेशच्या, म्हणजे माझ्या नवर्याच्या डोक्यात बर्याच दिवसांपासून शेतजमीन घ्यायचे विचार होते. त्याच्या एका नातेवाइकांच्या अशा एका शेतावर त्याने लहानपणीच्या सुट्ट्या घालवल्या होत्या. ते मॉडेल त्याच्या डोळ्यांसमोर होतं. पुण्याच्या आसपास आम्ही काही जमिनी बघूनही आलो होतो; पण अजून गणित जुळून आलं नव्हतं. आज तशीच एक फेरी होती. त्या ठिकाणी पोचलो. शेतजमीन म्हणजे नुसतं माळरान होतं. आसपास सगळीकडे उन्हाच्या मार्यामुळे सोनेरी-पिवळं पडलेलं भरपूर गवत होतं. आजूबाजूला बघितलं की लांबवर गावातल्या घरांची लाल कौलारू किंवा निळ्या पत्र्याची छपरं दिसत होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Shrikant Athawale
4 वर्षांपूर्वीलेख आवडला.
Mrunalini Kale
4 वर्षांपूर्वीलेख वाचून खूप ताजेतवाने वाटले