खा-पी के आंदोलन! हरकत काय? - जानेवारी २०२१


‘‘सब तय्यारी कर के आये हैं। खाने-पीनेकी कोई चिंता नहीं है। हम भी खायेंगे और दिल्लीवालों को भी खिलायेंगे। हमारी मांगे जायज हैं। हम सरकारको इतनी जल्दी छोड़नेवाले नहीं हैं।’’

पंजाब-हरियाणा-राजस्थान-उत्तर प्रदेशातून दिल्लीच्या सीमेजवळ दाखल झालेल्या आंदोलक शेतकर्‍यांच्या तोंडचे हे बोल आहेत.

या लाखो आंदोलनकर्त्यांमुळे दिल्लीकडे जाणार्‍या महामार्गांवर एक मोठं गावच वस्तीला आलं आहे. या शेतकर्‍यांनी दिल्लीच्या सीमाभागात राहुट्या-तंबू टाकले आहेत. त्यांच्या जेवणाखाण्याच्या व्यवस्थेसाठी भटारखाने उभे राहिलेत, लंगर चालवले जाताहेत. हे शेतकरी दिल्लीतल्या गोरगरिबांना खायला घालताहेत, तर दिल्लीतल्या आंदोलनाच्या समर्थकांनी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर ठिय्या देऊन असणार्‍या शेतकर्‍यांसाठी नाना प्रकारच्या सेवा देऊ केल्या आहेत. कुणी हजारो रोट्या एका वेळी तयार करणारी रोटी मशिन्स बसवली आहेत, कुणी त्यांचे कपडे धुऊन देण्यासाठी मोठाली वॉशिंग मशिंन्स आणली आहेत, कुणी केस कापण्याची सेवा देऊ करतंय, कुणी डॉक्टर्स शेतकर्‍यांच्या औषधपाण्याची सोय बघताहेत.. काही ठिकाणी आंदोलनातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी फूट मसाजर्सची सोय उपलब्ध करून दिली आहे. कुणी पिझ्झा लंगर लावलाय. ताबडतोब पाणी गरम करणारे पंजाबमधल्या ‘देसी गीझर’सारखे इनोव्हेटिव्ह प्रयोग सगळ्यांचं लक्ष वेधून घेताहेत.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Chandrashekhar Chaudhari

      4 वर्षांपूर्वी

    खरे सांगायचे तर हे शेतकरी होते की शेती चे धान्य खरेदी करणारे दलाल होते हे समजणे कठीण आहे....कारण जेवढे समजले आहे त्यावरून तरी ते धान्य खरेदी करणारे दलाल असावेत.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen