‘ब्लॅक लाइव्ह्ज’आणि ‘व्हाइट प्रिव्हिलेज’ - जानेवारी २०२१


अंक : अनुभव, जानेवारी २०२१

कल्पना करा, की उद्या दलितांवरच्या अत्याचारांविरुद्ध भारतभर मोर्चे निघाले, पण त्यांत दलितांच्या दहापट संख्येने सवर्ण सक्रिय सामील झाले, तर तो अनुभव आपल्याला कसा वाटेल? अगदी तसाच अनुभव अमेरिकेतल्या सर्वच शहरांत या वर्षी आला. ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या घोषणेखाली अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांनी पुकारलेल्या प्रचंड लढ्याच्या बातम्या भारतातही पसरल्या. अमेरिकेच्या सर्वच शहरांमधे कित्येक दिवस ही निदर्शनं चालूच राहिली. अनेक ठिकाणी दंगेधोपेही झाले. गोर्‍या वंशवादाला खतपाणी घालण्याचा आरोप असलेल्या ट्रंप सरकारने या निदर्शनांविरुद्ध पुकारलेल्या कठोर, कडव्या आणि कित्येकदा दडपशाही धोरणांना भीक न घालता, कोव्हिडजन्य संसर्गाला न घाबरता हजारोंच्या संख्येने अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली. जाती, धर्म, वंश, अर्थ अशा सर्व तर्‍हेच्या भेदांखाली दबलेल्या समाजघटकांचे प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्धचे असंख्य लढे जगभरात याआधीही होत आले आहेत. पण या वर्षाच्या अमेरिकी लढ्याचा एक अतिशय लक्षणीय फरक असा, की ज्या गोर्‍या समाजव्यवस्थेविरुद्धचा हा लढा होता, तो लढण्यात कृष्णवर्णीयांपेक्षाही गोर्‍या अमेरिकनांची संख्या कित्येक पटींनी जास्त होती!

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव- जानेवारी २०२१ , समाजकारण , विश्ववेध
समाजकारण

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen