‘आऊट ऑफ द वे’ जाऊन लिहिण्याची काही नवे, काहीसे बोल्ड आणि ब्लंट असे जीवनाचे अनुभव शब्दांकित करण्याची विजय तेंडुलकरांच्या प्रतिभेत ताकद आहे. भोवतालच्या उध्वस्त-विश्वात कुचंबलेल्या, भावनांचं मरण पाहणाऱ्या आणि त्यामुळे जीवनातला कोरडेपणा वाट्याला आलेल्या माणसांच्या व्यथा तेंडुलकर यांना दिसतात, भावतात, अस्वस्थ करतात आणि अशा अस्वस्थेतून प्रभावी नाट्य उत्पन्न होते. भीषण, ओंगळ, सडके-कुजके जीवन ज्यांच्या वाट्याला आले आहे अशांना सुद्धा ‘रंगमंचा’च्या आरशातले त्याचे प्रतिबिंब पाहवत नाही. ती अस्वस्थ होतात. आणि मग त्या आरशावर धावून जातात. आरसा फुटत नाही. तो फक्त हसतो. म्हणतो ‘तुमचेच तर रूप दाखविले. मग इतके अस्वस्थ का?’’ श्री. विजय तेंडुलकर यांचे ‘गिधाडे’ हे नाटक असेच बोल्ड, ब्लंट, भेदक, मनाला ओरबाडून काढणारे, अस्वस्थ करणारे, अंतर्मुख व्हायला लावणारे आहे असे मला वाटते. त्या नाटकात माणसात दडलेल्या गिधाडी वृत्तीचे काहीसे भडक वाटणारे, एकांगी स्वरूपाचे व त्यामुळे गौण वाटावे असे, काहीसे आक्रस्ताळी वाटण्याइतपत, भडक असे चित्रण केले आहे. ही सारी कथा एका वास्तूत, एका कुटुंबात आणि जवळजवळ सख्ख्या नात्याच्या माणसात घडते.याठिकाणी अनुभवविश्व एका कुटुंबापुरते सीमित दिसत असले तरीही तो अनुभव मात्र सीमित स्वरूपाचा नाही. तसा तो व्यापक स्वरूपाचा असा आहे. त्या नाटकात व त्या कुटुंबात जे घडते ते माणसातला पशु, राक्षस व माणसातले गिधाड पेटले तर कुठेही, केव्हाही घडू शकेल असेच आहे. एका अर्थाने प्रत्येक अनुभव तसा वैयक्तिक वा सीम ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
किरण भिडे
8 वर्षांपूर्वीजयदीप गोखले
8 वर्षांपूर्वीहा लेख पूर्वी मासिकात आणि किती साली प्रसिद्ध झाला होता?
Kiran Joshi
8 वर्षांपूर्वीVastunishtha Samiksha!
aparna kelkar
8 वर्षांपूर्वीवा फारच छान
किरण भिडे
8 वर्षांपूर्वीwww.punashcha.com/subscribe या लिंक वरून सभासदत्व घ्यावे. काही शंका वाटल्यास संपर्क साधा.
Vasant Dandekar
8 वर्षांपूर्वीजे मेंबर नाहीत त्यांनी काय करावे?