उच्च माध्यमिक स्तरावर भाषाविषयांच्या अभ्यासक्रमांतील असमानता

शिक्षणाच्या कोणत्याही स्तरावर भाषाशिक्षण हा एक अविभाज्य व महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा म्हणून विद्यार्थ्यांना भाषाशिक्षण दिले जाते. शिक्षणामध्ये जी भाषा प्रथम भाषा म्हणून अभ्यासली जाते ती साधारणपणे व्यवहारातही महत्त्वाची भाषा मानली जाते. किंबहुना, व्यावहारिक महत्त्व असल्यामुळेच  प्रथम भाषा म्हणून शिक्षणातील तिचे महत्त्व वाढते. मग ती विद्यार्थ्याची मातृभाषा असो अथवा नसो. आपल्याकडे इंग्रजीला हे मानाचे स्थान मिळाले आहे. मराठीसह इतर भाषांचा विचार द्वितीय व वैकल्पिक म्हणून केला जातो. कधी कधी दुसऱ्या स्थानासाठीही भारतीय भाषांमध्ये चढाओढ लागलेली दिसते. कारण तिथे अनेक पर्याय दिलेले असतात.  इंग्रजीची  मक्तेदारी निर्माण झाल्यामुळे उरलेल्या अवकाशात भारतीय भाषांना आपले अस्तित्व सांभाळावे लागत आहे. राजभाषा असूनही महाराष्ट्राच्या शालेय आणि उच्च माध्यमिक शिक्षणात मराठीची काय अवस्था आहे ह्यावर प्रकाश टाकणारा राजेंद्र शिंदे यांचा हा लेख… (पुढे वाचा)

————————————————————————————————————————————

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 4 Comments

 1. aratigawade

  बरोबर!शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे मराठी विषयाला पर्याय नकोत.इंग्रजी विषयाप्रमाणे सक्तीचा असावा.पुढच्या पिढीपर्यंत भाषा पोहचण्यासाठी, समृध्द होण्यासाठी हा निर्णय व्हायला हवा.

 2. Ravindra Ramchandra Pednekar

  माझं असं मत आणि निरिक्षण आहे की, महाराष्ट्र हा औद्योगिक आणि नोकरीच्या दृष्टीने तसेच इतर बाबतीतही इतर राज्यांच्या तुलनेत प्रगत आहे.
  राजकीय दृष्टीने स्थानिक पक्षांकडे एकहाती सत्ता येऊ नये तसेच राष्ट्रीय पातळीवरील पक्षांना महाराष्ट्रातील सत्ता मिळण्याची व्यवस्था व्हावी यासाठी इंग्रजी तसेच इतर भाषांना इथे महत्त्व देण्यात येते. जेणेकरुन परप्रांतीय इथे स्थायिक होऊन स्थानिक पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांनाही मतदान करतील आणि त्यांची सत्ता येण्याची संधी वाढेल.
  तुमचं मत काय ?

  1. vilasingle

   मत आणि निरीक्षण अचूक आहे, मराठी भाषिकांची स्वभाषा मराठीबाबत अनास्था आणि इंग्रजी शाळांचे आकर्षण सगळे कुचकामी ठरत आहे.

 3. vilasingle

  भाषा माध्यमाबाबत योग्य माहिती नमूद आहे, उच्च माध्यमिक स्तरावरील असमानता दूर करण्यासाठी काही सूचना किंवा नेमके काय करता येऊ शकतील ? तसेच आनुषंगिक भाषा विषयाबाबत लेखकाशी बोलता येईल करिता संपर्क व्हावा.

Leave a Reply