मराठी माध्यमात शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द असलेल्या व्यक्तीही मुलांना शाळेत घालायची वेळ आली की, इंग्रजी माध्यमाची निवड करतात. यासाठी कधी जागतिकीकरणाचे तर कधी घराजवळ चांगली मराठी शाळा नसल्याचे कारण सांगितले जाते. सभोवती असे विसंगतीपूर्ण वास्तव सर्रास पाहायला मिळत असताना इंग्रजी माध्यमात शिकलेली आई जाणीवपूर्वक आपल्या मुलाला मराठी माध्यमात घालते, त्याविषयीचे मनोगत सांगतायत मीना कर्णिक... (पुढे वाचा) ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------मी इंग्रजी माध्यमात शिकले, माझा नवरा (निखिल वागळे) मराठी माध्यमात शिकला आणि आमच्या मुलाला मराठी माध्यमात घालायचा आग्रह माझ्या नवऱ्याचा होता. सर्वसाधारण लोकांचं म्हणणं असतं त्याप्रमाणे मलाही सुरुवातीला मुलाला इंग्रजी माध्यमात घालायचं होतं. पण माझा नवरा म्हणाला की, “मुलांनी मातृभाषेत शिकावं ही माझी जाहीर भूमिका आहे. आणि दुसरं म्हणजे मी जे बोलतो ते व्यवहारात आणणार नसेल तर माझ्या विश्वासर्हतेचाही प्रश्न निर्माण होतो.”
मी ज्या इंडियन एज्युकेशन सोसायटी स्कूलमध्ये शिकले त्या शाळेत किंवा इतरही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलं शिक्षकांबरोबर अनेकदा मराठीत बोलत असतात, आपापसात मराठीत बोलल असतात. अशाप्रकारच्या शाळांमधून मुलांचं मराठी तर नीट होत नाहीच, पण इंग्लिशसुद्धा फार बरं होत नाही. इंग्रजी माध्यमात शिकणारा माझा पुतण्या “आई नाईन ओ क्लॉक वाजले, मला जेवायल ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
साधना गोरे
6 वर्षांपूर्वीआपलं म्हणणं खरं आहे. मात्र उच्च शिक्षणात इंग्रजीचाच टेंभा आहे तोवर आपल्याला सध्याच्या बाजारातील उपयुक्ततावाद आणि मेंदूशास्त्रातील विषय समजून घेतानाचे आकलन यातील फरक कळला तरी पुरे आहे. मैंदूशास्त्र आणि मानसशास्त्रही हेच सांंगतं की, कोणत्याही संकल्पनांचे आकलन मातृभाषेतून अधिक चांंगले होते.
[email protected]
6 वर्षांपूर्वीचांगला आहे लेख.विशेषतः मुलांना वेळ दिला पाहिजे इंग्रजी लिहायला मग हळूहळू त्यांना इंग्रजी येऊ लागेल हे पटलं.
Anand M khandagale
6 वर्षांपूर्वीमराठी भाषेतील उपयुक्त आणि दर्जेदार साहित्य वाचायला मिळेल ही अपेक्षा
Ravindra Ramchandra Pednekar
6 वर्षांपूर्वीउच्च आणि व्यावसायिक शिक्षणाची भाषा मराठी असल्यास तसेच अर्थार्जनाच्या क्षेत्रातही मराठीचा उपयोग केल्यास मराठी शाळांची संख्याही वाढेल आणि महत्त्वही. मात्र पुढील गोष्टीच इंग्रजी किंवा इतर भाषेवर जाणीवपूर्वक आधारित ठेवल्याने अशी परिस्थिती आहे असं मला वाटतं.