आनंददायी शिक्षणासाठी मराठी माध्यम!


राज्यकर्त्यांचे बोलणे आणि कृती यांमधील विसंगती हा सर्वसामान्यांच्या चर्चेचा एक नेहमीचा विषय असतो. याउलट एक सामाजिक कार्यकर्ती मात्र आपल्या मुलींना आग्रहाने मराठी माध्यमात शिक्षण देऊन सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी स्वतःला कशी जोडून घेते हे उद्बोधक आहे. परदेशात असताना मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणं आवश्यक होतं, मुंबईत आल्यावर मात्र आवर्जून मुलीच्या शिक्षणासाठी मराठी माध्यमाची निवड करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या रेखा ठाकूर आपल्या ह्या लेखात त्यांचा माध्यमनिवडीचा अनुभव सांगतायत -

------------------------------------------------

मराठी भाषेतलं, मातृभाषेतलं शिक्षण हेच उत्तम शिक्षण याच्याबद्दल माझी खात्री होती. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपण शिकतो, विशेषतः विज्ञान, गणित आणि इतर जी शास्त्रं शिकतो, त्या शास्त्रांची म्हणून एक भाषा असते. त्या शास्त्रांमधल्या ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना समजून घेणं हे ते विषय समजण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. या संकल्पना समजून घेणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. आपण मातृभाषेत विचार करतो, व्यक्तही मातृभाषेत होतो. मनातल्या मनामध्ये देखील जे चिंतन करतो ते आपल्या भाषेतच करतो. त्यामुळे एखादा शब्द जेव्हा आपल्याला अडतो, तेव्हा समजा तो इंग्लिशमधला असेल तर तो पहिल्यांदा तुमच्या मातृभाषेमध्ये समजून घ्यावा लागतो. म्हणजे परकी भाषा समजून घेणं म्हणजे त्यातलं भाषांतर समजून घेणं. तसेच आपले आजूबाजूचे जे काय अनुभव आहेत, आपलं जे काही एकूण वातावरण आहे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , भाषा , पालकत्व

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen