भाषाविचार – शिक्षणव्यवस्थेच्या परिघावरली लाखो मुलं (भाग – ६)

“बहुतेक ज्ञानशाखांमध्ये आज इंग्रजीत जे ज्ञान उपलब्ध आहे ते मराठीसारख्या प्रादेशिक भाषांमध्ये नाही. ते आणण्याची जबाबदारी कोणाची आणि त्यांनी ती आपली मानली नाही तर काय करायचं या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नाहीत. त्यामुळे ज्ञाननिर्मितीची ही लढाई आपण हरलो आहोत का? विद्यापीठात मी माझे अनेक सहकारी पाहतो. माझ्यासारखे लोक त्यांना मूर्ख तरी वाटतात किंवा दुराग्रही तरी वाटतात. मराठीतून लिहिणाऱ्या मुलांना काहीही भवितव्य नाही असं त्यांचं मत आहे. यात अमराठी मंडळींचा दृष्टिकोन खूपदा संशयास्पद असतो. त्यांना बहुतेकदा मराठीतून लिहिणाऱ्यांशी काहीही देणंघेणं नसतं. आपापल्या मातृभाषांबद्दल आग्रही असणारी ही मंडळी राज्याची राजभाषा असूनही मराठीबद्दल मात्र बेफिकीर असतात. त्यामुळे प्रादेशिक भाषांमधून लिहिणारी मुलं दुय्यम नागरिकांसारखीच असतात. त्या अर्थाने आपल्याला भाषिक स्वातंत्र्य मिळालेलंच नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे.” ‘भाषाविचार’ सदरातून ज्ञाननिर्मितीच्या भाषिक एकारलेपणाबद्दल सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार – 

—————————————-

सध्याच्या सत्र पद्धतीमध्ये मुलांच्या सतत फक्त परीक्षाच होत असतात. शिक्षकांचे कारकून झाले आहेत. परदेशात कुठेतरी एखादी व्यवस्था चांगली चालते, आपल्याकडले काही विद्वान, प्रशासक परदेशात जाऊन येतात. अपार करुणेमुळे तिकडे जे चाललंय ते आपल्याकडेही असावं असं त्यांना वाटतं. त्यातून जे प्रयोग जिथं वर्गात वीस मुलं आहेत अशांसाठी सुरू झालेत, ते इथं शंभर – दीडशे मुलं वर्गात आहेत अशा लोकांसाठीही राबवले जातात. त्यातून मुलांचं शिरकाण होतं. गुगलवरून कॉपी-पेस्ट करणाऱ्या लोकांचा जथा तयार होतो. या सर्व प्रक्रियेत प्रादेशिक भाषांचं काय होतं याचा विचार करू या.

हेही वाचलंत का?

भाषाविचार – इंटरनॅशनल शाळांचं फॅड आणि प्रादेशिक भाषा (भाग-५)

भाषाविचार – इंग्रजीचं जग आणि व्हर्नाक्युलर लोकांची प्रतिष्ठा (भाग – ४)

जिथे शिक्षणाचं माध्यम इंग्रजी आहे अशा ठिकाणीही सगळे लोक इंग्रजीतून पेपर लिहितात असं नाही; किंबहुना, लिहू शकतातच असं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी मुंबई विद्यापीठासारख्या ठिकाणी मराठी किंवा हिंदीतून उत्तरं लिहिण्याची सोय आहे. अर्थात त्यामागे उपकाराची भावना आहे. ‘तुम्हांला इंग्रजी येत नाही ना, मग लिहा तुमच्या भाषेत’ असा एक प्रयोग सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून प्रश्नपत्रिकांचा अनुवाद केला जातो किंवा तोंडी सांगितला जातो. काही ठिकाणी एखादा विषय शिकवणाऱ्याला मराठी येत नसतं. मग ज्यांना मराठी येतं अशांकडून अनुवाद करून घेतला जातो. वर्षानुवर्षे मुंबईत, महाराष्ट्रात राहून आपल्या विषयासाठी लागणारं किमान मराठी लोकांना का येऊ नये असा

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. jrpatankar

    चांगला आहे. एखाद दोन उपाय योजना तरी सांगा.

  2. nilambari

    अगदी खरं आहे

Leave a Reply