भाषाविचार – इंटरनॅशनल शाळांचं फॅड आणि प्रादेशिक भाषा (भाग-५)

“आपल्याला काय वाटतं यापेक्षा लोकांना काय वाटतं याचा विचार पालक अधिक करतात. एकेकाळी मराठी शाळांमध्ये इंग्रजी चांगलं न शिकवल्यानं आपण मागे पडलो. पण आता इंटरनॅशनल शाळांनी आपल्या मुलांच्या पिढीत हा अनुशेष वेगाने भरून निघेल असं पालकांना वाटतं. त्यांच्या मनातली खरी-खोटी भीती त्यांना इंग्रजीशरण बनवते. त्यांच्या या मानसिक गुलामगिरीचा फायदा इंग्रजी शाळा घेतात. इंटरनॅशनल शाळा या भाजणीतल्या सर्वोच्च स्तरावर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडचं शोषण सर्वाधिक आहे. ‘गुलामांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील’ असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. इंग्रजी शाळांचे गुलाम मात्र गुलामगिरीची जाणीव झाली किंवा करून दिली गेली तरी अधिक निष्ठेने इंग्रजी शाळांची गुलामगिरी करत राहतात. हा डोलारा कसा कोसळवायचा हाच खरा प्रश्न आहे.” ‘भाषाविचार’ सदरातून इंग्रजी शाळांच्या वर्चस्वाबद्दल सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार – 

——————————————————

देशभरामध्ये प्रादेशिक भाषांच्या शाळांना आणि एकूणच प्रादेशिक भाषांना वाईट दिवस आल्याचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रादेशिक भाषांतल्या शाळांची संख्या घटणं आणि इंग्रजी माध्यमाच्या कुत्र्यांच्या छत्र्या गल्लोगल्ली उगवणं. देशी भाषांमधून चांगलं शिक्षण मिळत नाही, इथल्या शिक्षणाने नोकरी आणि उद्योगाची कवाडं खुली होत नाहीत असा कांगावा पहिल्यांदा समाजाच्या मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाने सुरू केला. त्याचं अनुकरण आता बहुजन समाज करतो आहे. या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सुरुवातीला सीबीएसई, आसीएसई बोर्डाच्या शाळांची स्थापना आणि त्यानंतर हळूहळू आयजीसीएसई आणि आयबी या बोर्डांकडे झालेलं स्थलांतर. मुळात सीबीएसई, आसीएसई बोर्डांच्या शाळा या सरकारी नोकरीमुळे फिरस्तीवर असलेल्या लोकांच्या गरजेतून तयार झाल्या. पण आता मात्र मागेल त्याला सीबीएसई शाळा असं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्य मंडळांच्या अखत्यारीत असलेल्या अनेक शाळा आता आपले बोर्ड बदलून सीबीएसईच्या हाती जात आहेत. फक्त शहरांमधूनच नव्हे; तर अक्षरश: गावोगावी, नाक्यानाक्यांवर या शाळांचे फलक लागले आहेत. त्यामध्ये हमखास इंग्रजी शिकवण्याची हमी, नोकऱ्यांची आश्वासनं अशा अनेक गोष्टी आहेत. ‘शिक्षण पोट भरू शकलं पाहिजे आणि ते करण्याची क्षमता फक्त इंग्रजी माध्यमातच आहे’ ही भूमिका रुजवण्यात या शाळांचा मोठा हातभार आहे. मात्र या शाळा काय करतात हा प्रश्न नसून या शाळांकडे जाणारे पालक असं का वागतात, याचा तपास होण्याची गरज आहे.

हेही वाचा: –

भाषाविचार – तुमची मुलं कोणत्या शाळेत जातात? (भाग – ३)

भाषाविचार – इंग्रजीचं जग आणि व्हर्नाक्युलर लोकांची प्रतिष्ठा (भाग – ४)

पालक आपापल्या मुलांचा सुटासुटा विचार करीत असले तरी त्यांच्यात एक कळपाची मानसिकता देखील असते. ही मानसिकता वर्गीय आणि जातीय संदर्भ घेऊन येते. त्यामुळे आपल्या आर्थिक वर्गातली मुलं कोणत्या शाळेत जातात,

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. nilambari

    लेखकाने अतिशय परखडपणे सत्य विचार मांडले आहेत.

  2. rsanjay96

    लेख उत्तम आहे. इंग्रजी भाषा शिक्षण हे ऐकेकाळी मराठी माध्यमातून चांगले होते. यात मराठीचा पाया तयार होताना इंग्रजी मराठीतून समजण्याची प्रक्रिया पार पडत होती. आमची पिढीने मराठी आणि इंग्रजीचे अध्ययन याच पध्दतीने केलेले होते. यात ही चांगले वैद्यक, अभियंते ,शास्त्रज्ञ हे तयार झाले आहेत.
    आजची इंग्रजी शिक्षण व्यवस्था आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय स्कूल, सीबीएससी शाळा ही केवळ दुकानदारी झाली आहे. नव्वदनंतर मध्यमवर्गीय यास पूर्ण शरण गेले आहेत. या शरणजाण्यात अगतिकता अधिक दिसते.हजारो रुपये शाळांची फी भरणारा मध्यमवर्ग हा वर्तमानपत्रे आणि पुस्तकांवर पाचशे रूपये खर्च करत नाही. हा वर्ग स्वतः ला बुद्धिजीवी समजतो हा मोठा दांभिकपणा आहे.

Leave a Reply