भाषाविचार – भाषा आणि वादचर्चा-स्पर्धा (भाग – ७)

“महाराष्ट्रात काय किंवा देशाच्या इतर भागांमध्ये काय अशा शेकडो स्पर्धा होत असतील. त्यातून तरुण मुलांचं वैचारिक आदानप्रदान घडत असेल. नव्या पिढीचं भाषाभान समृद्ध करण्याच्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पण गेल्या दहावीस वर्षांत अशा स्पर्धांना जाणारी मुलं घटलीत. त्यांना इतर गोष्टी खुणावू लागल्यात. आपल्या तिजोरीला धक्का लावण्यापेक्षा महाविद्यालयं, संस्था आता प्रायोजक घेऊन चटपटीत, गडबडगुंडा, धांगडधिंगा असलेले कार्यक्रम करू लागलेत. त्यामुळे दिलखेच नाचगाण्याच्या कार्यक्रमांनी भरलेल्या फेस्टिव्हल्सनी सगळा माहोल भारलाय. इथे फार विचार नकोच आहे कुणाला. भाषाबिषांची भानगडच नको. सूत्रसंचालनापासून जाहिरातींपर्यंत सगळं इंग्रजीमय झालंय. त्यामुळे अशा स्पर्धा सांदीकोपऱ्यात घेण्याची वेळ लोकांवर आलीय. भाषेच्या दृश्य व्यवहारातलं एक परिणामकारक क्षेत्र आटतंय. इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं आधीच आपापल्या भाषांपासून दुरावली आहेत, त्यात ह्या इव्हेंटीकरणामुळे भरच पडलीय. हा दुष्काळ पावसाअभावी होणाऱ्या दुष्काळाइतकाच भयानक आहे. त्यातून बाहेर पडायचं तर अशा स्पर्धा गावोगावी व्हायला हव्यात. भाषा जगवण्याचा तो एक महत्त्वाचा मार्ग आहे.”  ‘भाषाविचार’ सदरातून तरुणांच्या भाषेविषयी सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार – 

——————————————————————-

मागे एका वादविवाद स्पर्धेचा परीक्षक म्हणून पुण्याला गेलो होतो. ‘प्रमाणित मराठीचा आग्रह मराठीच्या विकासासाठी बाधक आहे’ हे विधान वादविवादासाठी दिलं होतं. १९८८-९३ या काळात अशा स्पर्धांसाठी मी कुठेकुठे फिरलो होतो. नव्या मुलांमधला उत्साह, आकलन पाहायला मिळेल आणि एकूण भाषेबद्दल मुलं काय विचार करतात हेही कळेल म्हणून गेलो होतो. जो विचार मराठीसाठी होतो, तोच कमी अधिक फरकाने इतर भाषांसाठी करणं सहज शक्य आहे.

हेही वाचलंत का!

भाषाविचार – शिक्षणव्यवस्थेच्या परिघावरली लाखो मुलं (भाग – ६)

भाषाविचार – इंटरनॅशनल शाळांचं फॅड आणि प्रादेशिक भाषा (भाग-५)

चाळिसेक तरुण मुलं बोलली. अर्थातच  निम्मी विषयाच्या बाजूने आणि निम्मी विरोधात. स्पर्धेत बोलायचं म्हणजे दर वेळेला आपल्या मनात असतं तेच बोलता येतं असं नाही. त्यामुळे प्रमाण भाषेला विरोध करणाऱ्या काहींना तो नीट जमत नव्हता. विरोधकांचंही तसंच होत होतं. प्रमाण भाषा म्हणजे काय, प्रमाण आणि बोली भाषांचं नातं काय, दोन्हींचं सहजीवन शक्य आहे का आणि कसं, भाषेचा विकास म्हणजे काय, त्याचे मापदंड कोणते या आणि अशा अनेक प्रश्नांवर मुलांनी विचार करणं अपेक्षित होतं. पण ते घडलं नाही, काही अपवाद अर्थातच होते. मुलं भाषणं पाठ करतात किंवा त्यांना कुणीतरी ती लिहून दिलेली असतात. ही गोष्ट सुद्धा मुलांचं भाषिक कुपोषण सिद्ध करायला पुरेशी आहे. ‘मराठी’ हा शब्द अनेक मुलांना नीट उच्चारता आला नाही. याबद्दल या मुलांना

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. rsanjay96

    डॉ. दिपक पवार यांनी भाषा व्यवहारातील काही उत्तम निरीक्षणे नोंदवली आहेत. एकूणच भाषा शिक्षण आणि प्रमाणित भाषा हा समाजात, उद्योग क्षेत्रात महत्त्वाचा विषय राहिला नाही. भाषा न येताही व्यवहार जमावा,हे आता शिक्षणात सूत्र झाले आहे. अगदी काँनव्हेंट विद्यार्थी ही आज प्रमाणित इंग्रजी बोलत वा मांडत नाही.

Leave a Reply