अनेक वर्षांपूर्वीची मासिकं जपून ठेवणं फार जिकीरीचे असते. त्यांची पाने, मुखपृष्ठे सहज फाटू शकतात, कागद जुना झाल्यामुळे त्यांच्या पानाचा तुकडा पडतो किंवा त्यांना वाळवी पण लागू शकते. शिवाय मासिकातील पाने फाडून चोरून नेणारे बहाद्दर काही कमी नाहीत. या सगळ्या दिव्यातून एखादा अंक जपून ठेवणे तेही शंभर दीडशे वर्ष जुना असलेला देखील म्हणजे खरंच या ग्रंथालयांची कमाल आहे. यांच्यामुळेच हा संग्रह साकार होऊ शकतोय म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता.
ग्रंथ सखा- बदलापूर, ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय आम्ही आपले ऋणी आहोत.
मासिकांचा संग्रह
मासिकांची उलटता पाने
Bahuvidh Super Admin
2021-03-30 20:37:10