मी करंगळी. शरद पवारांची करंगळी. त्यांच्या उजव्या हाताच्या पंजाची करंगळी. त्यांच्या म्हणजे त्यांच्याच. अनेकदा विश्वासू, जवळच्या व्यक्तींना उजवा हात वगैरे म्हटलं जातं, त्या अर्थानं उजवा हात नव्हे. प्रत्यक्ष पवारांच्याच उजव्या हाताच्या पंजाची मी करंगळी. बुधवारपासून मी फारच अस्वस्थ आहे. गेली 75-76 वर्षे पवारांसोबत आहे मी, त्यामुळे पवारांचा काहीच भरवसा नसतो हे काही मी कुणाला नव्यानं सागायची गरज नाही. पण त्यांच्या या स्वभावाचा फटका मला, म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच करंगळीलाही बसेल असं मला कधी वाटलं नव्हतं. सगळी बोटं सारखी नसतात ते मला माहिती आहे आणि पवारांना माझ्यापेक्षा अंगठा जास्त प्रिय आहे हेही मला माहिती आहे. अनेकांना दाखवायला त्यांना तो सतत लागत असतो, त्यामुळं ते त्याला फार जपतात. याची आम्हा इतर चौघांनाही कल्पना आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
राजेंद्र गाेपालसिंह चंदेल
5 वर्षांपूर्वीछान जबरदस्त लेख मार्मिक पण मान राखिव व्यंगात्मक व परखड ऊपहासात्मक व सत्य पुन्हा सगळेच लेख आवडेल
mahendranene
7 वर्षांपूर्वीअप्रतिम!
राहुल सदाशिव खरात
8 वर्षांपूर्वीएक पाच वर्षांपूर्वी दैनिक लोकसत्ताला दर रविवारी लोकरंग पूरवणीमध्ये याच नावाने एक सादर प्रकाशित व्हायचे चालू घडामोडीवर उपहासात्मक पद्धतीने या सदरात लेखन केले जायचे. बड्या बड्या लोकांची सर्वच प्रकरणे अत्यंत प्रभावी शब्दात हाताळली जायची. विशेषतः यात चालू घडामोडीवर अत्यंत विनोदी पद्धतीने प्रकाश टाकला जायचा. याही लेखात राज्यातील असूनही देशपातळीवर मान्यता पाहिलेले आणि ज्यांच्या मनाचा कोणालाच थांगपत्ता न लागलेले आणि भल्या भल्याना आपल्या वक्तव्याने बुचकळ्यात टाकणारे शरद पवार यांच्या राजकारणाचा खरपूस समाचार लेखकाने समर्पक शब्दात घेतला आहे. लेखकाचे अभिनंदन
Siddheshwar
8 वर्षांपूर्वीभारी
amarpethe
8 वर्षांपूर्वीहा...हा...फार मस्त
maneeshanarkar
8 वर्षांपूर्वीMast?