लोक आपल्याला पाडत आहेत. झुंडीच्या झुंडी आपल्यावर चालून येत आहेत हे पुतळ्यांना कळलं आणि आपापल्या चौथऱ्यांसह ते आतून हलले, जागा सोडून निघाले, सुरक्षित जागा शोधू लागले. हे असं चौथरा सोबत घेऊन भटकणं शक्य नाही, गल्लीबोळांमधून वाट काढताना, लपताना चौथरा आडवा येतो, अडचणीचा ठरतो असं त्यांना वाटू लागलं. अंगापेक्षा हा बोंगाच मोठा आहे हे बऱ्याच पुतळ्यांच्या पहिल्यांदाच लक्षात आलं. काही पुतळे चौथऱ्यावर आधार देऊन उभे केले होते, त्यांनी लगेचच स्वतःला चौथऱ्यांपासून मोकळं करून घेतलं आणि स्वतंत्र झाले. काही पुतळ्यांचे पाय चौथऱ्याच्या दगडातच कोरलेले होते, त्यांना चौथऱ्यापासून वेगळं होता येत नव्हतं त्यामुळं ते करवादले होते. एखादा आजारी रूग्ण दगावल्यावर त्याचा बिछाना जसा केविलवाणा दिसतो तसे पुतळ्यांपासून स्वतंत्र झालेले चौथरे दिसत होते. एका चौथऱ्यानं तर न राहवून, गहिवरून पुतळ्याचा हात धरून त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला. "अरे नको ना जाऊस. तुझ्यामुळं माझी किंमत होती, मी एकटा असल्यावर मला कोण विचारणार?"
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
खूप छान लेख
Rdesai
6 वर्षांपूर्वीमार्मिक लेख !
mugdhabhide
8 वर्षांपूर्वीवैचारिक बेस बदलणार नाही aani घाई घाईत चौथऱ्यांची मात्र अदलाबदल झाली होती kiti marmik
bookworm
8 वर्षांपूर्वीमस्त लेख!
amarpethe
8 वर्षांपूर्वीछान
adityalele55
8 वर्षांपूर्वीनेहमी प्रमाणे दर्जेदार . तंबी दुराई तुमचे लेख हे जागतिक पातळीचे असतात . तुमच्या लेखांचं इतर भाषांमध्ये भाषांतर व्हायला पाहिजे. मराठी मधील एक हिरा जगालाही समजला पाहिजे. मनापासून इच्छा आहे अशी .
milindraj09
8 वर्षांपूर्वीउत्तम
kamatgirish
8 वर्षांपूर्वीनेहमीप्रमाणेच खुसखुशीत पण अंतर्मुख करणारा
SHASHI1945
8 वर्षांपूर्वीQuite juvenile.not up to Tambien Dusri standard