आणि त्याला सकाळ प्रसन्न वाटू लागली . . .


त्याची सकाळ आज लवकर झाली. झाली म्हणजे काय, ज्या कारच्या खाली तो झोपला होता त्याचा मालक आज सकाळीच उठून कुठं निघाला काय माहित. गाडी सुरू झाल्याचा आवाज आल्यावर त्याला गाडीखालून बाहेर यावंच लागलं. एरवी तो सकाळी १० शिवाय बाहेर पडत नसे म्हणूनच तर तो याच कारच्या खाली नेहमी झोपत असे. पण आज सकाळी सात वाजताच तो बाहेर पडला. दोन पाय मागे आणि दोन पाय समोर रोवत आपलं सर्वांग मोकळं करण्यासाठी त्यानं आळस दिला, अंग झटकलं, शेपूट उंचावलं आणि समोरच्या सोसायटीच्या गेटजवळ जाऊन एक पाय उंचावत धारातीर्थ सोडून दिलं. एक दीर्घ जांभई दिली. गेटच्या समोरच कचऱ्याच्या तीन फूट उंचीच्या प्लास्टिकच्या बादल्या ठेवलेल्या होत्या. दोन पाय वर करून बादलीत डोकावून यावं किंवा बादली आडवी पाडून त्यातला सगळा कचरा पायानं उचकटवून टाकावा, काही खायला मिळतं का बघावं, असं त्याला एक क्षण वाटलं, पण दिवसभर तेच तर करायचं आहे, आत्ताच कशाला सुरूवात करा म्हणून त्यानं विचार बदलला. एक तर या सोसायटीत बहुसंख्य शाकाहारी होते, त्यामुळं कचऱ्याच्या बादल्यांमध्ये दुधीची सालं, कार्ल्याच्या बिया, बिटाचा वरचा भाग, वांग्याची देठं असलंच काहीतरी मिळायचं. त्यात खाण्यासारखं काही शोधता शोधता जीव मेटाकुटीला यायचा. तेवढ्यात त्याला बाजूच्या सोसायटीला बुटका जीभ काढत गेटमधून बाहेर येताना दिसला. ‘कायरे बुटक्या, निघालास का तुझ्या मालकाला मॉर्निंग वॉकला घेऊन?’

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


तंबी दुराई

प्रतिक्रिया

  1. MADHAVIMD

      5 वर्षांपूर्वी

    छान

  2. mahendranene

      7 वर्षांपूर्वी

    लेख खूप आवडला

  3. SMIRA

      7 वर्षांपूर्वी

    मस्त!

  4. ckedar

      7 वर्षांपूर्वी

    मस्त!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen