आपली माणुसकी कायम ठेवून माणसाला विचारांबद्दल असा आत्यंतिक जिव्हाळा वाटला तरच विचारांचा विकास होतो असे मला वाटते. गांधीजींच्या विचारांबद्दल नंतरनंतर मला असेच वाटू लागले. माझ्या क्रांतिकारक समाजवादातली क्रांती खरीखुरी लोकशाहीवादी आणि माणुसकीला पोषक व्हायची असेल तर तिला गांधीजींच्या मूलस्पर्शी विचारांची जोड दिली पाहिजे असे मला वाट लागले. तरुणपणी अहिंसेची आम्ही खूप थट्टा करायचे. निसर्गातच हिंसा आहे, जीवनाच्या संघर्षात जगायला जो लायक आहे तोच जगेल, बळी असेल तोच कान पिळील हे सर्व उघडउघड आम्हांला दिसायचे. हिंसेनेच गोष्टी होतात. आणि होतात त्या झटपट होतात हेच आम्हाला खरे वाटायचे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Chandrakant Chandratre
2 वर्षांपूर्वीछान लेख.