प्रत्यक्ष


मी अस्वस्थ झालो. गांधीजींच्या दर्शनाला जायलाच हवे होते. कसे जायचे ? काय बोलायचे? ज्याला विचारावे सवरावे असे कुणीच आसपास नव्हते. मनाचा हिय्या केला. हातसुताच्या लडी हाताशी पुष्कळ होत्या. त्यांतल्या दोन बरोबर घेतल्या. गांधीजींना फुलांच्या हारापेक्षा हातसुताच्या माळा अधिक आवडतात हे ऐकून माहीत होते. मैल दीड मैल चालत निरेला गेलो. निरा स्टेशनचा सारा परिसर माणसांनी फुलून गेला होता. मी पिंपऱ्याच्या आश्रमातला पोरगा आहे हे माहीत असलेली निरेतली मंडळी माझ्याभोवती गोळा झाली. त्यांनी साऱ्यांनी आग्रह धरला, * गांधीजींना इथे उतरवा. ते चार शब्द बोलतील असे करा ! "

 

मी होकारार्थी मान डोलवीत होतो. गांधी उतरावेत आणि त्यांनी लहानसे का होईना, भाषण करावे हे योग्यच होते. पण ते मी कसे काय घडवणार? मंडळींना 'हो'कार दिला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. Kiran Joshi

      2 वर्षांपूर्वी

    बापूंचा हात आणि तोही पाठीवर? धन्य धन्य!! माझ्यावर रोमांच उभे राहिले. अहोभाग्यच म्हंटले पाहिजे. आमच्या पिढीला दुर्दैवाने त्यांच्या विचारमूल्यांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांचे विचार आचरणात आणणे दूर, त्यांचा अपमान व अवहेलना करून आपण आपली नवी ओळख जगाला करून देत आहोत. सत्य व अहिंसक वृत्तीने बलिष्ठ शत्रूचा मुकाबलाच नव्हे तर नमवताही येऊ शकते, हे त्यांनी सिद्ध केलं. आम्ही आपले ऋणी आहोत बापू.....!

  2. Swatita Paranjape

      2 वर्षांपूर्वी

    गदिमांचा हा उतारा सर्वाननि वचायका हवा. येता जाता लहान थोर गांधीजी विषयी अनादराने बोलत असतात. त्या महातम्याला जीवे मारणाऱ्यांना देशप्रमी म्हणून उदो उदो केला जातोय तेव्हा हे विचार जास्त लोकांपर्यज्ञत पोचणे खूप गरजेचे आहे. आपले आभार. खूप खूप धन्यवाद.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen