" गांधीजींनी जीवनातल्या अनेक गोष्टींतून आम्हाला मुक्त होण्याची शिकवण दिली. पण एका वस्तूशी मात्र कायमचं जखडून ठेवलं. ती ही वस्तू. " त्या घड्याळयाकडे मोठ्या कौतुकाने एखाद्या अवखळ पोराकडे पाहावे तसे पाहत बाळकोबा बोलत होते. दिवसाच्या प्रत्येक क्षणाचे मोल जाणत जगणे ही एक साधनाच आहे. गांधीजींच्याविषयी विचार करताना अनेक त-हेची कोडी पडतात. गांधीजी आणि भगवद्गीता. माणसाला नव्या नव्या कोड्यातच टाकणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. गांधीजींचा जीवनग्रंथ आणि व्यासांनी दिलेला गीताग्रंथ अवघड गणितांसारखा सोडवत बसावा. उत्तर सापडले असे वाटावे आणि सापडले त्याहूनही निराळे असावे अशी लगेच शंका यावी. गीतेप्रमाणेच गांधीजींनीही जीवनाच्या किती विविध अंगांना स्पर्श केला. गीता जशी भक्तियोग, कर्मयोग असे अनेक योग सांगते तसाच गांधींचा जीवनग्रंथ असंख्य योगांचे दर्शन घडवतो. पण त्यांचे घड्याळाशी जुळलेले नाते पाहिले म्हणजे वाटते की गांधींना प्रिय असलेला योग एकच होता : तो म्हणजे उद्योग.
ह्या माणसाने एका आयुष्यात किती उद्योग केले ! लहानसहान वाटणाऱ्या गोष्टींचा किती खोलात जाऊन विचार केला. ते राजकारणी होते, धर्मजिज्ञासू होते, शिक्षक होते, डॉक्टर होते, वकील होते, विणकर होते, चांभार होते, भंगी होते, पत्रकार होते, संघटक होते, प्रयोगशील ऋषी होते, कृषिक होते, स्वतःचे अर्थशास्त्र निर्माण करणारे अर्थशास्त्रज्ञ होते, अहिंसात्मक युद्धतंत्र निर्माण करणारे सेनापती होते....ही यादी सरता सरणार नाही. इतक्या निरनिराळ्या उद्योगांत स्वतःला गुंतवून घेणाऱ्या ह्या माणसाच्या दिवसाला तास तरी किती होते ?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
खूप छान लेख आहे . धन्यवाद.
मंदार केळकर
12 महिन्यांपूर्वीगांधींचं एका वेगळ्याच दृष्टीने केलेलं अवलोकन. विचार प्रवृत्त करणारा लेख
Ravi Shenolikar
12 महिन्यांपूर्वीमहान व्यक्तीबद्दल थोर लेखकाचा लेख. असे लेख शालेय पुस्तकात घेतले पाहिजेत. नव्या पिढीचे ह्यापेक्षा उत्तम मार्गदर्शन कोण करू शकेल?
Ashwini Gore
12 महिन्यांपूर्वीअतिशय सुंदर , गांधीजींना अधिक सोप्या पद्ध्तीने समजावून सांगण्याचे काम साक्षात पुलंनी केलंय , अप्रतिम . ' युगात्मा ' मधून छान लेख वाचायला मिळतायेत , धन्यवाद
Medha Vaidya
12 महिन्यांपूर्वीउत्तम लेख।
Suhas Joshi
12 महिन्यांपूर्वीइतका चांगला लेख दिल्याबद्दल आपले आभार
Hemant Marathe
12 महिन्यांपूर्वीयुगात्मा मधून विविध लेखकांच्या लेखणीतून जे गांधी भेटत आहेत त्यातून गांधी या नावाचे गारुड का लोकांवर होते ते कळून येते
Chandrakant Chandratre
12 महिन्यांपूर्वीपुलच ते.
फार छान लेख! पुलंनी गांधीजींच्या वागण्यातील अध्यात्माचे नेमके वर्णन केले आहे !