अखेरचे पर्व

युगात्मा    वसंत बापट    2021-08-05 14:00:02   

गांधीजींची कथा वेगळी आहे. ती कथा कुरुक्षेत्रापेक्षा व्यापक अशा रंगपीठावर, भारतीय युद्धापेक्षा विलक्षण पार्श्वभूमीवर घडलेली आहे. अवतारकृत्य संपले, आता देह ठेवावा हे योग्य अशी मानसिक अवस्था येण्यापूर्वी घडलेली आहे. श्रीरामापेक्षाही जबरदस्त द्वंद्वाच्या कात्रीत सापडलेल्या लोकनायकाची ही दारुण शोकांतिका आहे. शिकंदरापेक्षा मोठ्या सम्राटाच्या अगतिक पराभवाची ही गाथा आहे. बुडता हे जन । न देखवे डोळा.... म्हणून आपल्या अस्तित्वाचा अंश नि अंश झिजवणाऱ्या दधीचीची ही करुण कथा आहे. या अखेरच्या पर्वात गांधीजींनी ज्या धीरोदात्ततेचे दर्शन घडवले ती लोकोत्तर धीरोदात्तता इतिहासात दुर्मिळ आहे. या पर्वात गांधीजींची नियतीने म्हणा, परमेश्वराने म्हणा निष्ठुर कसोटी घेतली. आणि या कसोटीला गांधीजी पूर्ण यशस्वी झाले. अशा यशाचा उत्कर्षविंदू मरणातच सामावलेला असतो. मारेकऱ्यालाही आशीर्वाद देऊन गांधीजींनी आपल्या उज्ज्वल यशावरती अक्षय मोहोर उठवली.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. Aparna Mahajan

      10 महिन्यांपूर्वी

    युगात्मा वाचून बेचैन व्हायला होते. हृदयाची धडधड वाढते. झिंदाबादच्या झिंगेत योग्य काय हे ऐकायची कोणाची तयारी नव्हती. समाजाचे झिंगलेले रूप आजही तसेच आहे. नाही का?वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen