गांधी टोपी

पुनश्च    जयवंत दळवी    2021-08-16 16:00:02   

एकदा शिरोडे गावात मोटारी भरून शेकडो पोलीस आले. हाती लाठ्याकाठ्या आणि बंदुका. गोरे सार्जंट आले. ते कानपटात मारून गांधीटोप्या उडवू लागले. मिठागरां- भोवती कडेकोट पहारा पडला. सगळा गाव भीतीनं चेपल्यासारखा झाला. पण गांधी टोपी वाले चेपत नव्हते. दबत नव्हते. ते धुंदीनं ' लेंगे स्वराज्य लेंगे' गात होते. "महात्मा गांधी की जय " म्हणत होते.

सत्याग्रहाचा दिवस उजाडला. काही गावकरी भीतीनं घरात लपून बसले. काही धीर करून गंमत बघायला गेले. गांधीटोप्या बगळ्यांच्या थव्यासारख्या येत होत्या. पोलिसांची कडी तोडत होत्या. मिठागरांवर झंजावाती झेप घेत होत्या. दणादण लाठ्या बसत होत्या. पण मुठीतलं मीठ सुटत नव्हतं.

कितीतरी गांधीटोपीवाले जखमी झाले. घायाळ होऊन पडले. त्यांना उचलण्यासाठी गावकरी नकळत पुढे धावले. काही जण त्यांच्यासाठी गूळ आणि पाणी घेऊन आले. आणि मग हळूहळू गावातलं वातावरण नकळत बदलू लागलं. चहाच्या दुकानात गांधीटोपीच्या शौर्याच्या कथा ऐकू येऊ लागल्या.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


युगात्मा
प्रासंगिक

प्रतिक्रिया

  1. Harishchandra Gundaye

      3 महिन्यांपूर्वी

    खूप छान.... निशब्द 👌

  2. Hrushikesh Jagannath Mirgal

      3 महिन्यांपूर्वी

    मस्त लेख

  3. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख.

  4. Dr. Vivek Korade

      3 वर्षांपूर्वी

    मूठभर मिठाची ताकत स्पष्ट करणारा सुंदर लेख

  5. Prathamesh Kale

      3 वर्षांपूर्वी

    कमाल लेख ...

  6. Yogesh Tadwalkar

      3 वर्षांपूर्वी

    वाह!

  7. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    छान लेखन -



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen