मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर असल्याचं माहिती अधिकारात जाहीर झाल्यापासून मंत्रालयातील उदरांमध्ये खळबळ माजली होती. आपला नेमका आकडा मंत्रालयातील अधिकाऱ्यांना कोणी सांगितला, आपल्या बातम्या बाहेर कोण फोडतो यावरून हमरातुमरी सुरू होती. मुख्यमंत्र्यांच्या कक्षात राहणाऱ्या आणि त्यामुळे आपसूकच नेतृत्व करणाऱ्या गलेलठ्ठ उंदरानं दोन पायांवर उभं राहात आणि शेपटी उंचावत सगळ्यांना खडसाऊन विचारलं, ‘कोणी दिली ही अंतर्गत माहिती?’
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
राहुल सदाशिव खरात
8 वर्षांपूर्वीअतिशय समर्पक आणि कालसुसंगत लेख. उंदराच्या संवादातून सरकारच्या भोंगळ कारभाराचे धिंडवडे काढण्यात लेखक यशस्वी झाला आहे. मुळात सरकारने उंदीर प्रकरणात जी काय माहिती सादर केली तीच मुळात हास्यास्पद आहे. खरेतर या प्रकरणाकडे किती लक्ष द्यायचे हे सरकार आणि विरोधी पक्ष दोघांनाही कळायला हवे होते. राज्यसमोर अनेक गंभीर प्रश्न असताना सगळ्यांनीच याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून राज्यातील जनतेचे औट घटकेचे मनोरंजन केले पण त्यामुळे राज्याची आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांची देशपातळीवर अब्रू जायची ती गेलीच. राज्याचा सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे तर अर्थमंत्रालय सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे ही दोन्ही खाती सध्या सलाईनवर आहेत . शिक्षण आणि सांस्कृतिक खाते विनोद तावडे यांच्याकडे आहे त्यांच्या कारकिर्दीत शालेय आणि उच्च शिक्षण क्षेत्रात झालेले गोंधळ अभूपूर्व असून त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राचे अवमूल्यन झाले आहे. एकूणच सध्या राज्यपातळीवर शासन, प्रशासन , अर्थ आणि शिक्षण क्षेत्रात सगळंच आंनदी आनंद असून राज्य दिवळखोरीच्या वाटेवर आहे. याचे या तिन्ही मंत्र्यांना कसलेच सोयी सुतक नाही. या लेखाने उंदीर प्रकरण या तिन्ही खात्यांशी जोडून या खात्यांच्या अपयशावर प्रकाश टाकला आहे. याबाबत लेखक निश्चितच अभिनंदनास पात्र आहे