आईन्स्टाईनची खोली भाग २

मी आइनस्टाइनची अभ्यासिका पाहायला गेलो होतो, ते १९८१ मध्ये. १९५५  मध्ये त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे आइनस्टाइन वारले त्याला त्यावेळी जेमतेम पंचवीस वर्षं झाली होती आणि तरीही ज्या अभ्यासिकेत ते वीस-बावीस वर्षं काम करत, ती कुठे आहे, ते त्या संस्थेतील कुणालाच निश्चित ठाऊक नव्हतं! इन्स्टिट्यूटमध्ये ते आले तेव्हा जगातील अत्यंत नावाजलेले, आदरणीय व प्रतिष्ठित म्हणून त्यांचा लौकिक होता आणि तरीसुद्धा त्यांची बसायची खोली तिकडच्या कर्मचार्‍यांनासुद्धा नीट ठाऊक नव्हती. म्हणजे आता २०१३ मध्ये, आइनस्टाइन इथे वीस वर्षं काम करत होते, हेपण कदाचित ते विसरले असतील. उद्या कोणी प्रिन्स्टनला इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीजमध्ये जाऊन त्यांच्या अभ्यासिकेबद्दल विचारू लागला, तर त्याला निराश होऊन परतावं लागेल, ही शक्यता नाकारता येत नाही किंवा अतिशय वाईट पण अशक्य नाही अशी बाब म्हणजे एखादा तिथला कर्मचारी भलत्याच खोलीकडे विश्वासाने बोट दाखवील.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 4 Comments

  1. छान माहिती मिळाली.

  2. छान , मस्तच लिहीले आहे , वास्तववादी पण गमतीशीर छानच

  3. आईन्स्टाईनच्या अभ्यासिकेत मॅक्सवेल ,फॅरॅडे ,न्यूटन या संशोधकांबरोबर महात्मा गांधींचा फोटो होता .

  4. अप्रतीम लिहिलंय !! अगदी वास्तववादी, आपल्या (फार विचार न करता आपण बाळगत असलेल्या) समजुतींना धक्का देणारं, विचार करायला लावणारं !!! शिवाय, या लेखनात कोठेही अभिनिवेश किंवा अनाठायी टीकेचा सूर अजिबात जाणवत नाही हे स्वागतार्हच !!! छान स्थितप्रज्ञता बाळगून लिहिलंय…….. त्याचं पुस्तक वाचायला उद्युक्त करणारं !!!!

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: