
माणसाचं वय जसजसं वाढत जातं तसतसं त्याला आपल्या हातून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या यापेक्षा कुठल्या राहून गेल्या याचीच अधिक चुटपूट लागून राहते. सर्वांच्याच बाबतीत असं असेल असं नाही मी म्हणत. पण आयुष्याची गाडी उताराला लागते, नवं वळण काय घ्यावं ते सर्वस्वी आपल्या हातात राहत नाही. आता कासरा आपल्या एकट्याच्याच हाती नाही हे ध्यानात येतं आणि ही गोष्ट राहून गेली असं फार वेळा वाटायला लागतं. अशा राहून गेलेल्या गोष्टींत काही वैयक्तिक असतात, तर काहींचं समाजात आवश्यक असलेल्या घडामोडींशीही नातं असतं. आयुष्यात काही वैयक्तिक भागाच्या आणि आनंदाच्या गोष्टी असतात तशा सामाजिक जबाबदाऱ्या स्वेच्छेनं उचलायच्याही गोष्टी असतात. त्या जबाबदाऱ्याही ‘आनंदानं पार पाडायचं कर्तृत्व’, म्हणूनच अंगावर घ्यायच्या असतात. ताजमहाल पाहायचा राहून गेला किंवा काशीयात्रा राहून गेली ही वैयक्तिक गोष्ट झाली. तसल्या हौशी पुरवण्याच्या गोष्टींना अंत नाही. मनात जे जे आलं ते ते साध्य झालं असं जगात कुठल्याच माणसाला म्हणता येणार नाही. माझ्या परिचयाचे एक डॉक्टर आहेत. रोग्यांना औषधं देणारे डॉक्टर. साहित्य किंवा संगीताचे डॉक्टर नव्हे. कुठल्याही यशस्वी डॉक्टरांचं असावं तसंच त्यांचं धावपळीचं जीवन. गळ्यातल्या स्टेथोस्कोपशिवाय मी त्यांना कधीच पाहिलं नाही. प्रचंड प्रॅक्टिस. घरातून केव्हा जातात आणि रात्री केव्हा परततात, त्याचा त्यांच्या मुलांनाही पत्ता नसतो. बायकोला असावा. पण एकदा त्यांनी त्यांच्या दवाखान्यात कुणाचा तरी निरोप सांगायला आलेल्या आपल्या बायकोलाच ‘बोला, काय होतंय?’ असं विचारलं होतं, असं म्हणतात. कदाचित हा प्रश्न ऐकून त्यांच्या बायकोनं आश्चर्यानं ‘आ’ वासल्यावर त्यांनी जीभ बाहेर काढा असंही म्हटलं असेल. ते जाऊ दे. नाहीतर सांगायची गोष्ट राहून जायची. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मी माझी प्रकृती दाखवायला गेलो होतो. बाहेर हीss गर्दी. माझा नंबर आल्यावर आत गेलो. तपासणी वगैरे झाली. मला म्हणाले, ‘बसा!’ मी म्हटलं. ‘बाहेर गर्दी आहे.’ तसे म्हणाले, ‘बसा हो! गर्दी नेहमीचीच आहे.’ मी म्हणालो, ‘डॉक्टर, रविवारीसुद्धा तुम्ही परगावी प्रॅक्टिसला जाता, मग विश्रांती वगैरे कधी घेता?’ ते म्हणाले ‘विश्रांतीचं मला फारसं वाटत नाही. मला विश्रांतीची हौसच नाही’
Devendra
4 Jun 2018खूप वर्षांनी हा लेख पुन्हा वाचायला मिळाला. कालनिर्णयच्या जानेवारीच्या पाठीशी पुलंचा लेख हा पायंडा होता. असाच आणखी एक लेख ‘फुला रे फुला तुला वास कोणी दिला’ हा पुलांचाच लेख वाचायला मिळाल्यास उत्तम
vibha
26 Apr 2018THE BEST
Siddheshwar
14 Mar 2018खूप छान..
bookworm
25 Feb 2018पु लंचा लेख म्हणजे पुनःप्रत्ययाचा आनंद!👍👌
madhao sarpatwar
12 Feb 2018best article
Anjore
11 Feb 2018हा लेख कुठलाय सशुल्क सदरात येतो? तंबीदुराई की वेलणकर? कारण हा लेख वाचण्यासाठी सशुल्क मेम्बरशिप घ्या किंवा असेल तर अपग्रेड करा अशी सूचना येतेय.
Prashant Jagtap
2 Feb 2018mind fresh article 👌!!!!!
Mugdha bhide
30 Dec 2017एकदम मस्त. उत्तम.
Prakash Joshi
30 Dec 2017It’s always if I could have done this or that. But when you reminisce ,it somewhere touches your soul. Thank you so much for a very refreshing article.
shubhada.bapat
30 Dec 20172018 सुरवातच छान झाली