आणीबाणी अपरीहार्य का झाली ?

ज्येष्ठ पत्रकार, संपादक,भाष्यकार आणि आता खासदार कुमार केतकर यांची ओळख आणीबाणीचे आणि इंदिरा गांधी यांचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून आहे. गेली चाळीस वर्षे त्यांच्या भूमिकेत तसूभरही बदल झालेला नाही. केतकर यांच्या विद्वत्तेला आणि आंतरराष्ट्रीय अशा व्यापक दृष्टीला सलाम करतानाही अनेकांची जीभ अडखळते ती आणीबाणीशीच! आणीबाणीच्या विविध अंगांचा वेध घेणाऱ्या लेखांच्या मालिकेत आज देत आहोत कुमार केतकर यांचा लेख. केवळ अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या पार पुढे जाऊन त्यांनी आणीबाणी अपरिहार्य का झाली त्यामागील जागतिक संदर्भ या लेखात दिले होते.  तुम्हाला ते पटोत, न पटोत त्यांची दखल मात्र घ्यावीच लागते. त्यांचा एकेकाळी प्रचंड गाजलेला हा लेख ‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ या पुस्तकातून-

********

विसाव्या शतकातील सर्वात महाभयंकर म्हणून ओळखला जाणारा दुष्काळ १९७२-७३ आणि १९७३-७४ मध्ये पडला होता. फक्त भारतातच नव्हे, तर जगभर. त्या दुष्काळाचे स्वरूप इतके भीषण होते की अफ्रिका खंडातील इथिओपियासारखे देश पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. अशिया खंडात चीन, कंबोडिया, इंडोनेशिया आणि भारत या देशांत गावेच्या गावे ओसाड झाली. ग्रामीण शेतमजूर देशोडीला लागलाच; पण लहान व मध्यम शेतकऱ्यांनीही शहराची वाट धरली.

मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मराठवाड्यातून, गुजरात आणि मध्य प्रदेशातून आलेले भिकारी लोक पथाऱ्या टाकून पडलेले असत. ते भीक मागत नसत. पण ते  उपाशी आहेत, हे सहजच लक्षात येत असे. त्यांची लहान-लहान मुलं स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्या मुंबईकरांकडे काहीतरी खायला मागत. ती चिमुरडी पैसे मागत नसत; कारण भीक मागायला ती सरावलेली नव्हती. स्टेशनच्या कडेकडेने वृद्ध व कृश म्हातारा-म्हातारी ग्लानी आल्यागत पडलेले असत.

महाराष्ट्रात नुकतीच रोजगार हमी योजना सुरू झाली होती. अवघ्या राज्यात एकाच वेळेस १५ लाख स्त्री-पुरुष रस्त्यांवर खडी फोडायला, पाझर तलाव खोदायला व रस्ते करायला कामावर उतरले होते.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 8 Comments

  1. लेखातला विचार महत्वाचा. लिहणारी व्यक्ती अथवा जिच्याबद्दल लिहले आहे ती व्यक्ती हा वेगळा भाग झाला. साठ व सत्तरच्या दशकाबाबत सर्वांचे बहूदा एकमत होईल की दुसरे महायुध्दोत्तर अनेक महत्वाच्या गोष्टींनी त्याकाळात आकार घेतला. आपल्या नियंत्रणात नसलेल्या अनेक बाबी असूनही इंदिराबाईंनी एका समर्थ राष्ट्राच्या उभारणीचा पाया रचला. त्याकाळातील कोणत्याही देशी अथवा विदेशी राजकारणी व्यक्तींपेक्षा इंदिराजी कित्येक योजने पुढे होत्या. केतकरांचा समर्पक लेख.

  2. भंपक लिखाणाची परिसीमा. या शिवाय दुसरे शब्द नाहीत. अर्थात त्यांच्याकडून काही तौलनीक लिहिले जाईल अशी अपेक्षा तरी का करावी? डावीकडे झुकून मध्यम मार्गी असल्याचा आव आणण्यात बुद्धिमत्ता खर्ची पडली की हेच होणार!

  3. अत्यंत लांगुलचालन करणारा एकांगी लेख असून बेलाशक खोटे नाटे लिहिले आहे याचा फायदा म्हणून शेवटी एकदा राज्यसभेवर खासदारकी मिळाली.

  4. माहितीपूर्ण लेख

  5. आणीबाणीच्या कालखंडा च अतिशय छान वाचनीय विश्लेषण.

  6. कुमार केतकर ह्यांचे विचार निश्चित पणे बरोबर आहेत , नीट विचार केला तर श्री इंदिरा गांधी योग्य च होत्या आणि तशीही आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांची मानसिकता पाहता हुकूमशाही हीच योग्य

  7. हुशार माणसाची बुद्धी वाकडी चालायला लागली कि असे लिखाण होते. इंदिरा गांधी काही धुतल्या तांदळा सारख्या स्वच्छ नव्हत्या जर्मन पाणबुड्या, सुकोय विमाने, विक्रांत या सर्व अव्वा च्या सव्वा भावाला खरेदी केल्या होत्या. आपण JERICHO FILES नावाची कादंबरी वाचा. त्यात रशिया आपला हेर इस्रायेल मध्ये पंतप्रधान करतो तीच परिस्थिती होती. आणि आजही आहे. रशिया च्या पाठीम्ब्यामुळे त्यांना आणीबाणी आणायची हिम्मत झाली.

  8. विद्वत्तेचा गैरवापर आणि वकिली पांडित्य या खेरीज भाटगिरी हा शब्द वापरल्यास केतकर रागावतील नक्कीच, सध्या लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस यांनी चिदम्बरम यांची विकतची पत्रकारिता ज्या प्रमाणे चालवली आहे त्याप्रमाणेच आहे हे याशिवाय अधिक लिहिणे म्हणजे या पत्रकाराचे स्तोम माजवणे होईल

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: