विवाहिता व पूर्वाश्रम

लेखिका – गीता. ज. साने, बी.एससी.

‘स्त्री’चा नोव्हेंबरचा अंक चाळीत असताना स्त्रियांचे नाव ह्या गोष्टीने माझा उल्लेख करून चर्चा केलेली आढळल्यामुळे मी हा लेख लिहिण्याचे धाडस करीत आहे.

लग्नाबरोबर आपले पहिले नाव टाकून नवे घेण्याची पद्धती इतकी रूढ झालेली आहे की, लग्नानंतर वधूने नाव बदलले नसेल अशी शंकाही कोणाला येत नाही. त्याहूनही विशेष म्हणजे ‘नाव बदललेले नाही’ हे निश्चित माहीत असूनही नवऱ्याच्या नावावरच बायकोला ओळखण्याची जबरी! १९३२ मध्ये लग्न झाल्यानंतर मी नाव बदलले नाही, माझे नाव व सही पूर्वीप्रमाणेच ‘गीता जनार्दन साने’ राहिली, ह्याचे अनेकांनी अनेक अर्थ काढले आणि पुष्कळांनी माझ्या सासरच्या नावानेच माझ्याशी पत्रव्यवहार करण्याचा आग्रह दाखविला. ‘तुझं तुझ्या पतीवर प्रेम नसेल’ असे बोलण्याइतकीही शाळेच्या इन्स्पेक्टरची मजल गेली!

नावासारखा क्षुल्लक प्रश्न; पण त्याला इतके महत्त्व का प्राप्त झाले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे! प्राचीन काळी स्त्रियांची, निदान प्रसिद्ध स्त्रियांची नावे बदलीत नसत, हे सहज सिद्ध करता येईल.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu