बुद्धिबळाचा जन्म

संकलकः श्रीपाद डोंगरे

सर्व खेळांचा राजा म्हणजे बुद्धिबळाचा खेळ. जगांतील बहुतेक देशांत तो खेळला जातो, इतकी त्याला लोकप्रियता प्राप्त झालेली आहे. इतर खेळांपेक्षां या खेळाचें कांही वेगळेंच वैशिष्ट्य आहे. या खेळांतील यशापयश हें काहीं केवळ खेळाडूच्या नशीबावर अवलंबून असत नाही. अगदीं क्षुल्लक चूकहि येथें घोडचूक ठरते. प्रत्येक ‘चाल’ अत्यंत विचार करून करावी लागते. या ठिकाणीं बुद्धीची परीक्षाच असल्यामुळें या खेळाला ‘बुद्धिबळ’ असें नांव पडलेलें आहे. खेळाडूनें आपल्या बुद्धीचें असेल-नसेल ते बळ खर्च केल्याशिवाय या ठिकाणीं चालायचेंच नाही! दोन निरनिराळ्या देशांतील खेळाडू, आपापल्या देशांत आपापल्या घरी, पुढें पट ठेवून वायरलेसच्या आधारानें खेळूं शकतील, असा हा एकच आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा खेळ आहे. १८५१ पासून प्रतिवर्षीं या खेळाचे आंतरराष्ट्रीय सामने अगदीं नियमित चालू आहेत. यावरूनच हा खेळ किती महत्त्व पावलेले आहे याची सहज कल्पना येऊं शकेल.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: