नवे कोंबडीचे अंडे ऐसे घड्याळ झळकले…

‘ क्या बात है! ‘ गायक अलगदपणे समेवर येतो तेव्हा, एखादा शायर त्याच्या गझलेतल्या शेराचा शेवटचा कळीचा शब्द ऐकवतो तेव्हा, आपल्या तोंडून ‘क्या बात है’ अशी दाद बाहेर पडावी तशी आजचा हा लेख वाचताना ती वाक्या-वाक्याला द्यावी लागेल. घड्याळ हा या लेखाचा विषय आहे असे सांगणे म्हणजे दिशाभूल करणेच होईल. कारण निमित्त घड्याळाचे आणि लेख मात्र मनुष्य स्वभावातील खाचाखोचा सांगण्यावर. लेखाची शैली, लेखकाचे निरीक्षण आणि त्याची शब्दकळा केवळ अप्रतिम. इतका सुंदर, मार्मिक विनोद फारच क्वचित वाचायला मिळतो.

यशवंत नरसिंह केळकर यांनी हा लेख लिहिला आहे. केळकरांची ओळख मुख्यतः गंभीर संशोधनपर लिखाण करणारे अशीच आहे. परंतु त्यांनी १९३५ ते १९५६ या काळात ‘केसरी’त सहायक संपादक म्हणून काम करताना स्फुट लेखन केले होते. त्याच दरम्यान त्यांना आपल्यातील ललितलेखकाचा शोध लागला असावा. बरीचशी इतिहास संशोधनपर पुस्तके, शाहीरी परंपरेचा अभ्यास आणि ‘म्हणी अनुभवाच्या खाणी’ हे पुस्तक असा त्यांचा ग्रंथसंभार आहे.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

This Post Has One Comment

  1. लेखक हलकंफुलकं लिहिता लिहिता फार मोठं तत्त्वज्ञान अगदी सहज सांगून जातात…
    मला खालील वाक्यं फार भावली.
    …वर्तमान म्हणजे काळाच्या समुद्रात क्षणभर गोठून गेलेल्या उदकाचा हिमनग होय. तो एका बाजूने म्हणजे भूताच्या बाजूने सारखा द्रवत असतो आणि दुसऱ्या म्हणजे भविष्याच्या बाजूने सारखा दृढ होत असतो…
    …पावलापुरता का होईना पण वाट दाखविणारा प्रकाश असल्यामुळे प्रवासी भविष्यात पुढे पुढे घुसतच असतो आणि त्यामुळेच प्रतिक्षणाला त्याचा वर्तमानकाळ बदलतच असतो…

    ते म्हणतात की “लौकिकरीत्या वर्तमानकाळाचेच जगाला अधिक महत्त्व वाटावे हेही सहाजिकच आहे आणि जगातील प्रत्येक व्यक्ती कोणच्याही हेतूकरता असो वर्तमानकाळाचा प्रत्येक क्षण कारणी लावण्याचा प्रयत्न करीत असते…” हे विधान आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं कारण ज्याला वर्तमानाचं महत्त्व वाटलं त्याने घड्याळ शोधलं खरं पण आपण ते वापरताना ‘वर्तमान काळाचे’ अर्थात “वेळेचे” महत्त्व ओळखू लागलो तर उपयोग.

Close Menu
%d bloggers like this: