‘१८’ म्हणे ‘१९’ ला….

काळरुपी अंड्याच्या कवचाला तडा गेला आणि त्यातून २०१९चा जन्म होऊ लागला. २०१८च्या ३६५ दिवसांच्या आयुष्यातील केवळ काही घटका उरल्या होत्या. २०१९ने अंड्याच्या फुटलेल्या कवचातून बाहेर पाहात २०१८ला विचारलं, ‘काळाच्या उदरात गडप होण्याआधी चार शहाणपणाच्या गोष्टी सांगशील की नाही? तसं तर माझ्याकडे चार्ज देताना तुला तुझा भूतकाळ माझ्या हवाली करायचा आहेच, पण माहिती देणं आणि ज्ञान देणं यातला फरक मला कळतो. गुगलता आलं की सगळी माहिती मिळते, मात्र ज्ञान देणारं तंत्रज्ञान जन्माला आलेलं नाही कारण कृत्रिम बुद्धिमत्ता आली तरी अद्याप कृत्रिम अनुभव कुणाला तयार करता आलेला नाही.’ १८ नं १९कडे प्रेमानं पाहिलं आणि म्हणाला, ‘जन्माला येण्याआधीच तुझ्यात एवढं शहाणपण आहे हे पाहून मला बरं वाटलं, कारण तुझ्या ३६५ दिवसांत लोकांच्या शहाणपणाचा कसं लागणार आहे.’

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)
Close Menu
%d bloggers like this: