आकाशाचे खांब

मराठी भाषा आता फक्त राजकारण करण्यापुरती उरत्ये की काय, असं सभोवतालचं वातावरण आहे.

येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुम्ही नक्की काही संकल्प केले असतील. मग त्यात आपली ‘मराठी भाषा टिकवण्याच्या’ संकल्पाची एक छोटीशी भर टाकणार का?

प्रत्येक माणूस जन्माला आल्यावर हळूहळू बोलायला शिकतो. तो बोलायला लागण्यामागे त्याच्या आजूबाजूला असलेल्या ‘बोलणाऱ्या’ लोकांचा खूप मोठा वाटा असतो. कानावर पडणारी भाषा, भाषेचा लहेजा, भाषेचा नाद, भाषेची लय, त्या भाषेतली गाणी हे सगळं ते लहान मूल आत्मसात करत असतं. त्यामुळे तुम्ही कुठल्या भाषिक आई वडिलांच्या पोटी जन्माला आलात यापेक्षा तुमचं बालपण कुठल्या लोकांच्या सान्निध्यात गेलं हे जास्त कळीचं ठरतं. ज्यांचे बालपण त्यांच्याच भाषेच्या लोकांमध्ये गेलं त्यांच्यासाठी ही खूप सहज प्रक्रिया असते.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)
Close Menu
%d bloggers like this: