तेंडुलकरांच्या कोशाला धक्के आणि हिसके!

विजय तेंडुलकर हा माणूस आणि लेखकही समजायला अत्यंत अवघड. त्यांच्या लिखाणावर ते लिखाण हिंसक  असल्याचे आरोप झाले, जगण्यातलं केवळ क्रौर्य आणि कुरुपताच त्यांना दिसते असेही म्हटले गेले. परंतु तेंडुलकरांना डावलून मराठी साहित्य, नाटक, सिनेमा यापैकी कशाचाही विचार करता येत नाही. मध्यमवर्गीय जाणिवांना धक्का देण्याचं काम ते सदैव करत आले. ‘माझ्या हाती बंदुक दिली तर मी नरेंद्र मोदींना मारेन’ असे विधान करून ते कधी खळबळ उडवून देत तर लाखाचा  सरस्वती सन्मान पुरस्कार स्वीकारताना टीका झाल्यावर, ‘मला पैशांची गरज आहे म्हणून मी पुरस्कार घेतला’ असे स्पष्ट सांगून ते मजा बघत. ‘तें’ या एका अक्षरात होणारा त्यांचा उल्लेखही असाच जगावेगळा. वयाच्या १४-१५ व्या वर्षीचे अर्थपूर्ण भरकटलेपण त्यांनी फार पूर्वी म्हणजे १९७० साली एका मनोगतात सांगितले होते, त्याचे हे शब्दांकन-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: