माणसे तोडण्याची कला

फेसबुक आणि व्हाट्सॅपने खोट्या कौतुकाचा अतिरेक करून ग्रेट, ऑसम, फॅट्स्टिक हे शब्द फारच स्वस्त करून टाकले आहेत याचा अनुभव आपण रोज आणि क्षणोक्षणी घेत असतो. एखाद्याने अगदीच सामान्य वाटेल अशी चार ओळींची कविता ‘टाकली’ तर तिलाही ‘डोळ्यांत पाणी आलं’ पासून तर ‘खूप दिवसांनी काही तरी उत्तम वाचलं’ अशा शेकडो प्रतिक्रिया पडतात. याच्या मुळाशी ‘‘उगीच कशाला दुखवा?’’ ही सार्वजनिक भावना असतेच, शिवाय आपण काही तरी लिहू तेव्हा त्याचंही कौतुक व्हावं यासाठी घेतलेली ती सावध भूमिकाही असते.  गंमत म्हणजे, ‘कोणाला कशाला दुखवा उगाचच’ या भावनेचा सोशल स्फोट आपण आज पाहात असलो तरीही समाजात मात्र ती फार पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. ही प्रवृत्ती घातक असून ‘माणसे तोडण्याची कलाही’  किती आवश्यक आहे हे १९७० सालच्या, ‘पैंजण’ या मासिकातील प्रस्तुत लेखात श्रीराम बोरकर यांनी गंमतीदार उदाहरणे देत सांगितले आहे.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 8 Comments

 1. “वा! छानचआहे!” चे युग फेसबुकने सुरू केले. लोकांना त्याची सवय लागली. अभिप्रायच जर छान म्हणावे याच अपेक्षेने मागितला असेल तर खरंचच का वाईट बोलून दुखवा?
  सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर संगीत व नृत्याचे रिएॅलिटी शो चालतात त्यातही हेच करतात. ” काय गायलीस तू! लता मंगेशकरांनंतर तूच!” .आशा भोसले परखड बोलतात तर त्यांना जज्ज म्हणून काढून टाकतात. मुलांना देखील नाही ऐकून घ्यायची सवयच नाही. त्यांच्या पालकांना तर त्याहून नाही.
  हे जर सर्वत्रच आहे तर मग कशासाठी दुखवा?

 2. अप्रतिम। किती ताजा वाटतो आजही। सत्य स्पष्टपणे तरीही समोरच्याचा आदर ठेवून सांगता येते, हेच अनेकांना कळत नाही। त्या त्या क्षेत्रातील जबाबदार माणसांनी नवोदितांना खरा अभिप्राय देने, आवश्यक ते मार्गदर्शन करणे हीही एक जबाबदारी आहे।

 3. लेखाचा विषय लक्षवेधक, काही परिच्छेदांची वाक्यरचना भलतीच पकड घेणारी. उदाहरणांची मीमांसा कमी असती तरी चालले असते असं वाटलं. लेख आवडला.

 4. आजच्या समाज माध्यमा मुळे हे प्रश्न आपल्या घरा पर्यंत पोचले आहेत

 5. आज हा लेख जास्तच आवश्यक आहे.
  स्तुतीसुमनांची बरसात, नव्हे नायगाराच सगळीकडून कोसळत असतो.
  पण उगाच कशाला दुखवायचे ही भावना चिरकालीनच दिसते.
  नेहमीप्रमाणेच वाचनीय लेखाबद्दल धन्यवाद 👌👌👌

 6. अर्धशतकापूर्वीच्या या लेखातले म्हणणे आजही तसेच लागू पडते; किंबहुना त्याची तीव्रता अधिक आहे. पण काही माध्यमे समाजातील सर्वसामान्यांना सहज उपलब्ध झाल्यावर याची दुसरी बाजूही दिसते. ‘उगाच कशाला दुखवायचे’ हे जसे एकीकडे, तसेच दुसरीकडे ‘ट्रोलिंग’ही दिसते. ‘ट्रोलिंग’चा उद्देश ‘उगाच कशाला कुणाला सुखवायचे!’ असा तर नसेल ना? माणसे दुखवायला माणसे घाबरतात हे खरेच. मी मात्र माणसे दुखवून ठेवण्यात पारंगत आहे. हेतू चांगला असताना कानफाट्या नाव पाडण्यात आल्याने काही माणसे आपोआप दुखावत गेली, एवढे खरे.

 7. समर्पक लेखन.

 8. योग्य सल्ला खुसखुशीत भाषेत!

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: