मेतकुट जमलं !

मेतकूट जीभेला चव आणतं. मेतकूट जमलं असं म्हणतात, तेव्हा दोन व्यक्तींच्या नातेसंबंधालाही चव आलेली असते. जगण्याला चव येते ती तुमचं स्वतःच्या जगण्याशी मेतकूट जमल्यावर. किरण भिडे यांच्या बाबतीत ते झालं आहे. आत्ता ठाणेकरांना ओळखीचे झालेले ‘मेतकूट’ आणि सवयीचे झालेले ‘काठ आणि घाट’, ही दोन्ही हॉटेल्स कशी सुरु झाली,  किरण भिडे नामक एक एमबीए व्हाया माधवबाग उकडीच्या मोदकापर्यंत कसा पोचला याची ही खमंग कथा-

********

’’आई, अगं केवढ्या पुरणपोळ्या केल्या आहेस या ?अख्ख्या बिल्डिंगला वाटायच्यात की काय ?’’

‘‘गप रे! समोरच्या मेनन काकूंकडे द्यायच्यात यातल्या दहा. त्यांचा मुलगा सूनपण येणारेत आज त्यांच्याकडे. उद्या चार शाळेत पण घेऊन जाईन. स्टाफरूममध्ये परवाच विचारत होते, भिडे मॅडम बर्‍याच दिवसात पुरणपोळ्या नाही खाल्ल्या तुमच्या हातच्या.‘‘

‘‘आई अगं तुला लोक चढवतात हरभर्‍याच्या झाडावर आणि तू पण किलो किलोच्या पुरणपोळ्यांचा घाट घातलास  धन्य आहे तुझी.  आपल्या पुरत्या करायच्या तर…..’’

माझं वाक्य अर्ध तोडत, ’’असू दे रे. तेवढ्याच चार जणांच्या तोंडी लागतात.’’ असं म्हणून आईने विषय संपवला.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 33 Comments

 1. वा! मस्तच आहे या मेतकुटाची रेसिपी.

 2. सुंदर लेख सर, मेतकूट चा प्रवास वाचून खूप मोटिवेशन मिळालं, लगे रहो

 3. चविष्ट!! आमच्या बोरिवलीतही शाखा ये ऊदे!

 4. ‘मेतकूट’ हे नावंच छान आहे.लेख ही उत्तम .तिकडे जाणाऱ्या खवैयांच्या अपेक्षा पूर्ण होतातच आणि हॉटेलशी मेतकूट जमतेच !!! तुम्हाला भरपूर शुभेच्छा !!

 5. मस्त. पोट भरलं

 6. Visited this hotel, great food 😋

 7. लेख खूप छान. मे तकू ट नाव आवडलं

 8. मस्त. मेतकूट जमत असताना केलेल्या चर्चा आणि वाद विवाद आठवले. एका उत्तम निर्मितीत आपलाही सहभाग होता याचे समाधान मला मेतकूट विषयी इतर लोक कौतुकाने बोलतात तेंव्हा नेहमी मिळते.

 9. मेतकूट ची जन्मकथा खूपच रंजक वाटली आणि ‘ मेतकूट ‘ मधील मिळणाऱ्या ” पुरण पोळी ” इतकी आवडली. अस्सल महाराष्ट्रीयन थाळी व नाश्त्याच्या विविध पदार्थांचे (टिपिकल मिसळ,उपमा,पोहे,वडा सोडून) पर्याय देणारे ‘ मेतकूट ‘ अल्पावधीतच ठाण्याचा एक ” मानबिंदू ” ठरले आहे याचा आम्हांस एक ठाणेकर म्हणून देखील रास्त अभिमान आहे. असाच ” खाद्यानंद ” सर्वांना देत रहा .पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

 10. ‘ मेतकूट ‘ ची जन्मकथा simply gr8 ! गिरगावातला मराठी माणूस उपनगरात जायला सुरुवात झाली आणि त्याचा थेट संबंध पूर्वीची नामांकित , मराठी पदार्थाची खासियत असणारी , उपाहारगृहे बंद पडण्यात झाला . अशा परिस्थितीत मोठ्या नेटाने तुम्ही , तुमच्या कुटुंबाने आणि मित्र परिवाराने सर्व अडचणी पार करुन यशस्वी केलेल्या ह्या उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन !
  मराठी माणसाचेच पाय ओढणार्यानी एकदा कौतुकाचीही टाळी वाजवावी .

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: