एक नष्ट झालेलं करिअर!

सांप्रत काळ मोठा कठीण आहे.

सध्या भारतात आणि जगात आर्थिक मंदीच आगमन झालं आहे की ही फक्त सुरुवात आहे यावर अनेक असलेले आणि नसलेले अर्थतज्ञ डोकेफोड (एकमेकांचे) करत आहेत. पण रिकाम्या वेळात फालतू पिक्चर बघणे ह्या उद्योगात गेल्या काही वर्षात प्रचंड मंदी आहे. वास्तव वगैरे पिक्चर यायला लागल्यापासून तर काही करिअर हे जवळपास नष्ट झाले आहेत. हे बघून अस्मादिकांना प्रचंड हळहळ वाटत आहे.

त्यापैकीच एक म्हणजे कुठल्याही जुन्या सिनेमामध्ये मुख्य गुंडाचे साथीदार, म्हणजे ‘असिस्टंट गुंड’ हे करिअर. गेल्या कित्येक सिनेमांमध्ये हे कोरस गुंड गायबच झाले आहेत. एक काळ ह्या पंटर लोकांनी खूप गाजवला. कारण त्यांच्याशिवाय हिरोईन ही हिरोला पटतच नसे. गाणं म्हणून, उडया मारून, गिफ्ट देऊन काही हिरोईन पटत नाही तेव्हा हेच गुंड अतिशय उदार मनाने हिरोच्या मदतीला येत. मग सामाजिक भावनेने हिरो कसाही असला तरी त्याच्या हातचा मार खात आणि मग खऱ्या अर्थाने प्रेमकथा सुरू होई. बरं ह्याच लोकांना प्रचंड मारपीट केल्यानंतरच त्या हिरॉईनचा बाप लग्नाला हो म्हणे.

त्यावेळी हिरोला हिरो का म्हणायचं? असा प्रश्न मला पडायचा. तसं बघायला गेलं तर ह्या लोकांच्या बाबतीत मला खूप प्रश्न पडायचे जसं की, हे गुंड म्हणून करिअर करावं असं ह्या लोकांना का वाटत असेल?

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu