रोलवाला कॅमेरा- एक नॉस्तॅल्जिया

सद्यकाळात सगळ्यात जास्त वापरले जाणारे संपर्कसाधन म्हणजे मोबाईल फोन.

फक्त कॉलिंगच नव्हे तर कॅमेरा, टॉर्च, कॅलेंडर, इंटरनेट अशा अनेक सुविधा त्यात आहेत. त्यातली फोटो आणि सेल्फी काढण्याची सोय तर बहुदा सगळ्यात जास्त वापरली जाते.

पण आधी ही सुलभता नव्हती. फार जुनी गोष्ट नाही; अगदी वीस वर्षांपूर्वीपर्यंत सुद्धा फोटो हा प्रकार अतिशय अपूर्वाईचा होता. कधीतरी, विशेष प्रसंगी लाभणारा सोहळा असायचा तो. आमच्याकडे आम्हा भावंडांचा वाढदिवस साजरा केला जायचा. यातले सगळ्यात प्रमुख आकर्षण म्हणजे फोटोग्राफर बोलावला जायचा. भिंतीला एक चांगल्या डिझाईनची चादर बांधली जायची; त्यासमोर खुर्चीवर सत्कारमूर्ती, समोर औक्षणाचे ताट, पार्ले किंवा रावळगावच्या चॉकलेटचा पुडा आणि भोवती नातेवाईक आणि शेजारपाजारच्या लहान मुलांची गर्दी.

एकट्याचे दोन तीन फोटो, मग ओवाळतानाचे फोटो, आणि मग ग्रुप फोटो असा कार्यक्रम असायचा.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. काहीसं उशिराच वाचला लेख, सुंदर वाटला ! जुन्या आठवणी जाग्याकेल्याबद्दल धन्यवाद !!
    – शैलेश पुरोहित

Leave a Reply

Close Menu