भाद्रपदात उमललेली प्रेमकथा – २

चॉकलेट सँडविच

***

प्रभात रोडवरचा पराक्रम आटोपून शार्दूल त्याच्या महात्मा सोसायटीतल्या घरी आला तेव्हा रात्र झाली होती. सगळीकडे गणपतीच्या वातावरणाचा आनंदी सुगंध पसरला होता. घरी आला तेव्हा तिथे पाहुण्यांचा गप्पांचा फड रंगला होता. आपला खुललेला चेहरा कोणाला दिसू नये याची त्याने पुरेपूर काळजी घेतली तरी पाहुण्यांच्या चाणाक्ष नजरेने जे टिपायचं ते टिपलंच. शार्दूलच्या आईला तो का आणि कुठे जाणार याची कल्पना होती. बाबांना नेहमीप्रमाणे फक्त कुणकूण लागली होती. तरीही शक्य तितका साधा चेहरा त्याने ठेवला आणि गप्पांत सहभागी झाला.

तिथे ओवीलाही आभाळ ठेंगणं झालं होतं. घरी पांगापांग झाल्यानंतर ती तिच्या खोलीत गेली स्वत:च गिरक्या घेतल्या आणि फोन उघडला. शार्दूलला भसाभसा मेसेज केले. काल दोघंही दिवसभराच्या कामांमुळे थकले होते.त्यामुळे कालचा फोन लवकर आटपला होता. शेवटी आज संध्याकाळी त्यांच्या FC road च्या चॉकलेट सँडविचच्या अड्ड्यावर भेटायचं ठरलं.

कालच्या पैठणीनंतर आज ओवी पुन्हा हॉट पॅन्ट्सवर आली होती. त्यामुळे शार्दूलला थोडंसं हायसं वाटलं. अशाही गोष्टींची सवय होते हे त्याला जरा नवीनच होतं. प्रेमात पडल्यापासून अशा अनेक नवीन गोष्टी त्याला उमजल्या होत्या. एका नव्या विश्वात दोघांनी प्रवेश केला होता. नववीपासून ते एकत्र शिकले होते. एकमेकांशिवाय पान हलत नाही हे त्यांना लगेच कळलं होतं. पण तरी प्रेमात बिमात पडू असं त्यांना वाटलं नव्हतं. पण असं अवचित झालं नाही ते प्रेम कसलं?

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu