पूर्णविराम आणि अर्धविराम!

चौथीचा वर्ग. गुरूजींनी आज त्या मुलाला पुन्हा उभं केलं आणि विचारलं, ‘मी काय सांगतो ते तुला कळतं का?’

मुलगा मान खाली घालून जोरात म्हणाला, ‘हो गुरूजी, कळतं.’

‘अरे कळतं काय? तुला मी सारखा सांगतो की हळू बोल…हळू बोल. ‘आत्ता, हो गुरूजी कळतं,’ असं म्हणतानासुध्दा तू किती मोठ्यानं ओरडलास?’

‘मी ओरडलो?’

‘तर काय?’

‘गुरूजी मी तर नम्रपणे बोलत होतो.’

‘बाळा, अरे नम्रपणे बोलताना आपला स्वर खाली येत असतो.’

‘गुरूजी, माझा स्वर खालीच आला होता.’

‘याला खाली आला म्हणतात? अरे हा खाली आलेला स्वर ऐकून एखादा वर जाईल. बैस खाली आता.’

***

सर शाळेत मराठी व्याकरण शिकवत होते.

त्यांनी एक उतारा लिहून घ्यायला सांगितलं. हं मुलांनो लिहा. मुलं लिहू लागली. ‘नागपुरची संत्री संपूर्ण भारतात प्रसिध्द आहेत. ही संत्री दिसायला जरी आकर्षक नसली तरी चवीनं मात्र अत्यंत मधूर असतात. नागपुरातील बाजारात ट्रक भरभरून संत्री येतात तेव्हा ते दृष्य फारच मनमोहक दिसतं. संत्री नुसती विकण्यापेक्षा त्याचा रस, त्याची मिठाई वगैरे करून विकली तर शेतकऱ्यांनी नक्कीच आता होतो त्याहून अधिक पैसा मिळेल.’

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 2 Comments

  1. छान. लेख आवडला.

  2. लेखाचा शेवट खूप छान

Leave a Reply

Close Menu