केरळमधील धिंगाणा सर्वस्वी अयोग्य

पुनश्च    वसंत काणे    2019-02-04 06:00:49   

अंक : रोहिणी,  जुलै १९५९ लोकशाहीवर संपूर्ण विश्र्वास असलेल्या भारतांतील एका राज्यांत सध्या राजकीय धिंगाणा चालू आहे. भारताचे नेतृत्व हे लोकशाहीनिष्ठ आहे अशा वेळी या धिंगाण्यास वेळीच आवर घातला गेला नाही तर तो भारतास फार मोठा धोका आहे. केरळमध्ये या लोकशाहीचा जो उघड उघड खून पाडण्यांत येत आहे, त्याला त्या राज्यांतील सर्व राजकीय पक्ष जबाबदार आहेत. एकटे सरकार किंवा विरोधी पक्ष यांना वेगवेगळा दोष न देता उभयतांना दोषी धरण्यावाचून गत्यंतर नाही, अशी येथील वस्तुस्थिती आहे. अशा वेळी सर्व पक्षांच्या भारतीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन या विघातक प्रवृत्तीस आळा घातला नाही तर ते लोण कोठपर्यंत जाईल, याची कल्पना करवत नाही. ******** भारतातील इतर राज्यांत काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकाररुढ असतांना केरळमध्ये कम्युनिस्टांची राजवट असणे यांत तसे फारसे वैषम्य वाटण्याचे खरे कारण नाही. उलट त्यामुळे भाराताचा लोकशाहीवरील विश्र्वास जास्त परिणामकारक ठरतो. परंतु केरळमध्ये जे घडत आहे ते फार विचित्र आहे. कम्युनिस्टांची अशी मनीषा प्रत्ययास येते की आता एक राज्यांत आपले आसन स्थिर झाल्यानंतर हळुहळू आपण हातपाय पसरण्यास हरकत नाही. या त्यांच्या महत्त्वाकांक्षेतून त्यांची जी वागण्याची पद्धत व कार्यपद्धती आचरणांत आणली जात आहे ती सर्व साधारण जनतेस मानवणारी नाही. दहशतवादाचा आश्रय घेतल्यावाचून आपणांस राज्य यशस्वी करतांच येणार नाही अशी त्यांची समजूत नव्हे तर खात्री आहे. केरळमधील इतर पक्षही मोठे राष्ट्रप्रेमी आहेत असे नाही. तेथील ख्रिश्र्चन जमात आणि मुस्लिम लीग यांना भारताविषयी किंवा केरळविषषयी काडीचेही प्रेम असण्याचे कारण नाही. पण त्यांच्या ममनोदारणेचा विचार न करता काँग्रेसवाले त्यांच्या गळ्यां ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , रोहिणी

प्रतिक्रिया

  1. akashvthele

      6 वर्षांपूर्वी

    सुरुवात वाचताना बहुतेक आजचाच लेख आहे असं वाटलं! पण जुना असला तरी कालसुसंगत लेख आहे! आजही थोड्या फार फरकाने तेच चालू आहे!

  2. bhavsarpankaj

      6 वर्षांपूर्वी

    निरंजन यांच्याशी सहमत

  3. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    यावेळी लेखाचे शीर्षक कालसुसंगत वाटले म्हणून थोडी गंमत...:-)पण एकंदर राजकारण्यांचा धिंगाणा सार्वकालिक आहे.

  4. TNiranjan

      6 वर्षांपूर्वी

    हा लेख आता इथे प्रकाशित करण्यात काय हशील? शीर्षक वाचून असं वाटतं की आताच्या शबरीमला संबंधित काही असेल. पण हे जरा वेगळंच आहे.... असो.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen