fbpx

पुनश्च : मराठी सशुल्क डिजिटल नियतकालिक

मराठी नियतकालिके हा मराठी साहित्यातील एक मानबिंदू आहे. १५० वर्षांची परंपरा लाभलेल्या या छापील माध्यमाने मराठी साहित्याला अनेक उत्तम लेखक आणि अक्षर असे साहित्य पुरवले. या सर्व नियतकालिकांमधून आजच्या काळातही सुसंगत असेल असे साहित्य निवडून ते document करून website आणि mobile app द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘पुनश्च’.

धुळाक्षरं कालांतरानं भूर्जपत्रांवर अवतरली तरी आपण अजून त्यांना धुळाक्षरंच म्हणतो. कारण नवं स्वीकारताना आपल्याला जून्याचा पदर घट्ट धरून ठेवायचा असतो. जे आहे ते हातचं सुटू नये आणि नवं ते मात्र मिळत रहावं. माणसाचा हा स्वभावच आहे. पुनश्चचाही तोच स्वभाव आहे. माणसाचा स्वभाव जसा चेहऱ्यावर दिसतो तसा एखाद्या उपक्रमाचा हेतू त्याच्या बोधचिन्हात उमटायला हवा. बोधचिन्ह म्हणजे हेतूचा बोध करून देणारं चिन्ह. आमचं बोधचिन्ह हा प्रवास आहे अक्षरांचा, या अक्षरांनी नोंदवून ठेवलेल्या मानवी आकलनाचा.

पूनर्निमितीचे प्रतिक असलेल्या हिरव्या रंगाच्या भूर्जपत्रांवर उमटलेल्या अक्षरांचा लांबचा भूतकाळ. पुराणे,संत साहित्य यांनी अध्यात्माशी नातं जोडत माणसांना अक्षरांशी जोडून ठेवलं तो त्यानंतरचा काळ. साहित्यात समाजातील घडामोडींचं प्रतिबिंब उमटून पुस्तकांचा प्रसार झाला तो त्यापुढचा काळ आणि छापील पुस्तकांसोबतच स्मार्टफोन,टॅब,किंडल,लॅपटॉप यांतून अक्षरं उमटू लागली तो आजचा काळ. हा काळ आम्ही सांधतो आहोत पुनश्चमधून.

मराठी भाषेनं आणि मराठी माणसानं चौकटी मोडण्यात कधी हयगय केली नाही. विषय, आशय आणि दृष्टी याबाबतच्या चौकटी मोडू पाहणारी पुनश्चची काळ्या शाईतली अक्षरं आपल्याला साद घालत आहेत. चला, वर्तमानाला इतिहासाशी जोडूया, चौकट मोडूया… पुनश्च सोबत!

पुनश्च नियतकालिकातील लेख

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..

Close Menu