भाग्यवान वेड्यांची दुनिया…

पुस्तकांवरील पुस्तके म्हणजे बुक्स अबाउट बुक्स हा एक अत्यंत रमणीय साहित्यप्रकार आहे. वाचनाचे वेड असलेल्यांना तसेच पुस्तकांबद्दल व एकूणच ग्रंथव्यवहाराबद्दल आस्था असलेल्यांना अशी पुस्तके वाचण्यात एक अवर्णनीय आनंद मिळत असतो. इंग्रजीमध्ये अशी बुक्स ऑन बुक्स अनेक आहेत. पण मराठी मध्ये अगदी आता-आतापर्यंत अशा प्रकारच्या पुस्तकांची वानवा होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतल्या काही चोखंदळ व व्यासंगी वाचकांनी आपल्या वाचनाबद्दल, वाचनानंदाबद्दल तसेच एकंदरीत ग्रंथव्यवहाराबद्दल पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये निरंजन घाटे यांचे ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’, सतीश काळसेकरांचे ‘वाचणार्‍याची रोजनिशी’, नितीन रिंढे यांचे  ‘लीळा पुस्तकांच्या’, निखिलेश चित्रे यांचे ‘आडवाटेची पुस्तके’ अशासारख्या पुस्तकांचा गौरवाने उल्लेख करावा लागेल. तत्पूर्वी गोविंदराव तळवलकर, अरुण टिकेकर यासारख्या व्यासंगी विद्वानांनी  आपापल्या ग्रंथप्रेमाबद्दल व वाचनानंदाबद्दल लिहिले होते.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘eGyan-key’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘eGyan-key’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

 1. ajitpatankar

  पुस्तक डाउनलोड केले. वाचले.
  १४३ पाने आहेत. (पान क्रमांक ८ व ९ नजरचुकीने दोनवेळा scan झाले आहे)
  पुस्तक अप्रतिम आहे.
  शा.श. रेगे यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे पुस्तकाचे दोन भाग आहेत. एक ग्रंथालयासंबंधी आणि दुसरा वाचनासंबंधी.
  वरील लेखात उल्लेख केलेल्या बाबींव्यतिरिक्त या पुस्तकात :-
  पुस्तक वाचावे कसे? याचे उत्तम वर्णन आहे. काही वेळा नर्म विनोदी शैलीतील वाक्ये वाचताना गंमत वाटली. उदा. (पुस्तकात खूण ठेवताना) …… “मी आपला पानाचे कोपरेच मोडणे जास्त पसंत करत असे. पानाचा कोपरा मोडताना, त्या पुस्तकाच्या विद्वान लेखकाचा मी जणू कानच पिरगळीत आहे असा मला आनंद व्हायचा”….
  पुस्तक उघडायचे कसे? ग्रंथालयात पुस्तकांची मांडणी कशी करतात? याविषयी माहिती दिली आहे.
  वाचकांच्या दोन तऱ्हा देखील मांडल्या आहेत.
  त्यावेळी देखील वाचायला वेळ मिळत नाही असं म्हणणारे लोकं होते. त्यावर लेखकाने, मिनिटाला दोनशे शब्द या गतीने वाचले तर किती वाचन होईल याचा हिशेब मांडला आहे. ( मी मिनिटाला आठशे शब्द, या गतीने वाचतो !!!)
  “मराठी पुस्तके संपत नाहीत, विकली जात नाहीत” असे ढमढेरे या प्रकाशकांचे वाक्य या पुस्तकात आहे. म्हणजे ही तक्रार आजची नाही. १९६७ साली देखील हीच परिस्थिती होती. !!!!
  आज तर ई बुक हा प्रकार लोकप्रिय होत आहे. ई बुक हे किंमतीच्या दृष्टीने स्वस्त असले तरी डोळ्याला आणि वाचायला त्रासदायक आहे हे खरेच. पण मला हवी असलेली दोन जुनी पुस्तके केवळ ई बुक स्वरूपात उपलब्ध होती. त्यामुळे वाचायला तरी मिळाली.
  भानू शिरधनकरांच्या या दुर्मिळ पुस्तकाचा परिचय करून दिल्याबद्दल आणि विशेष म्हणजे PDF स्वरूपातील पुस्तकाची link दिल्याबद्दल बहुविधचे मन:पूर्वक आभार.

 2. asiatic

  नवीन चांगली माहिती देणारा लेख.

Leave a Reply to ajitpatankar Cancel reply