भारतीय संविधान शिकताना...


जेव्हा जेव्हा आपल्या समाजात मोठ्यांना अस्वस्थ करणाऱ्या काही घटना घडतात. एक देश, एक समाज म्हणून आपण करत असलेल्या वाटचालीत काही आव्हानं उभी राहतात, तेव्हा शाळकरी वयातल्या मुलांच्या मनातही त्याचे पडसाद उमटत असतात. मुलांना व्यक्त व्हायला मोकळा अवकाश देणारी पुण्यातील अक्षरनंदन शाळा आपल्या शाळेत अशा प्रश्नांवर मुलांना बोलतं करते. खैरलांजी हत्याकांड, शेतकरी आत्महत्या, निर्भया प्रकरण यांची चर्चा त्या त्या वेळेस मुलांबरोबर झाली. अशा चर्चा होताना मुलांनी स्वतः विचार करून आणि अभ्यास करून मगच त्याबद्दल काही म्हणावं, याची काळजी घेतली जाते. जे लोक पूर्ण बांधिलकीनिशी काम करत आहेत अशा लोकांना शाळेत आमंत्रित केले जाते. त्यांच्याशी मुलं मोकळेपणानं बोलतात. शाळेच्या एक संस्थापक सदस्य सुहासताई अशाच एका अस्वस्थ करणाऱ्या घटनेची चर्चा करायला शाळेत आल्या होत्या. रोहित वेमुल्ला या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. एक सामाजिक बांधिलकी मानणारा, हुशार, तरुण, दलित मुलगा आत्महत्या करतो, या घटनेची दखल बऱ्याच मुलांनी घेतली होती. तेव्हा शाळेत राज्यशास्त्राच्या तासाशी या घटनेची चर्चा जोडावी, संविधानाची मूलतत्त्वे शिकताना त्याची आपल्याच काळात घडणाऱ्या घटनेची तपासणी करण्यातून मुलांनी ती शिकावी, असं वाटून मेघाताईंनी सुहासताईंना बोलायला निमंत्रित केले. त्याविषयी सुहासताई लिहीत आहेत - (अधिक वाचा)

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

< ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण

प्रतिक्रिया

  1. साधना गोरे

      5 वर्षांपूर्वी

    हो. नववीतल्या मुलांमध्येही असे विषय समजून घेण्याची पात्रता असते. आपण त्यांच्याशी कसा संवाद साधतो यावर ते अवलंबून आहे. आणि ही शाळा मी पाहिलेली आहे.

  2. ugaonkar

      5 वर्षांपूर्वी

    खूप चागला विषय पण खराच का ९ वीतील मुलाना हा विषय समज्ला



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen