fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

काँग्रेसचे घवघवीत यश…पण कधीचे?‘भारत सरकार-कायदा १९३५’ या अंतर्गत  ब्रिटिश भारतातील ११ प्रांतांमध्ये  १९३६-३७ साली प्रांतिक निवडणुका घेण्यात आल्या.  त्यात ८ राज्यांत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला तर बंगाल,पंजाब, सिंध या तीन प्रांतात काँग्रेसला अपयश आले. त्यावेळच्या निकालांचे विश्लेषण करणारा हा अप्रतिम लेख ‘आनंद’ या मासिकाच्या मार्च १९३७च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. गोपीनाथ तळवलकरांनी या लेखात केलेले कॉंग्रेसच्या यशाचे वर्णन वाचून आजच्या काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यांत अपयशाचे पाणी येईल आणि त्या काँग्रेसची जागा आता आपण घेतली आहे, या भावनेने भाजपचे पाठीराखे मात्र सुखावतील. तब्बल ८२ वर्षांपूर्वीचा हा लेख वाचताना खूपच मनोरंजन होते. ‘हिंदी जनता व्यक्तीपेक्षां संस्थेला अधिक महत्त्व देण्याच्या मार्गांत आहे हे निःसंशय! अर्थात् व्यक्तिमाहात्म्य् अद्यापी कमी झालेले नाही आणि कायमचे कमी होणे तर केव्हांच शक्य नाही.’ अशी वाक्ये वाचल्यावर लेखकाचे द्रष्टेपण जाणवते. पुढील आठ दशकांत देशाच्या विविध भागातील राजकारण कशी वाटावळणे घेत आजच्या स्थितीला येऊन पोचले याचाही अदमास आपल्याला येतो. देशाच्या राजकीय प्रवासाचा अभ्यास करण्यास अत्यंत उपयुक्त असलेला हा लेख आहे.

गोपीनाथ तळवलकर हे तब्बल ३५ वर्षे आनंद या मासिकाचे संपादक होते. त्यांनी बरेच बालसाहित्य लिहिले. प्रख्यात पत्रकार, संपादक स्वर्गीय गोविंदराव तळवलकर यांचे ते चुलते.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has One Comment

  1. एका घराण्याच्या वळचणीला नेऊन बांधल्यामुळे एके काळी काँग्रेस असे यश मिळवत होती हे ही आता अविश्वसनीय झाले आहे.

Leave a Reply to shripad Cancel reply

Close Menu